esakal | बाळापुरात विनाकारण फिरणाऱ्या ५२ जणांची रॅपिड टेस्ट; दोन निघाले बाधीत

बोलून बातमी शोधा

बाळापूर कोवीड तापसणी
बाळापुरात विनाकारण फिरणाऱ्या ५२ जणांची रॅपिड टेस्ट; दोन निघाले बाधीत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आखाडा बाळापुर ( जिल्हा हिंगोली ) : येथील मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या ५२ जणांची धरपकड करुन शुक्रवारी (ता. २३ ) कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलीच जरब बसल्याने शहरात शुकशुकाट दिसत आहे.

आखाडा बाळापूरसह जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश असताना काहीजण विनाकारण दुचाकीवर फिरत असल्याचे अनेक वेळा आढळून येणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल केला आहे. तरीही विनाकारण करणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने शेवटी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर व पथकाने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाराना पकडून त्यांची कोरोना चाचणी सुरु केली आहे. शहरात विनाकारण फिरणारे रस्त्यावर दिसताच पोलिसांनी दुचाकी उभी करुन त्यांची चौकशी सुरु केली. योग्य कारण मिळत नसल्याने अशांना पकडून त्यांची अँन्टीजेन तपासणी केली.

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राकडून १९७ कोटींचा निधी- प्रताप पाटील चिखलीकर

दोन तासांमध्ये ५२ जाण्याची अँटीजन रॅपिड चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासाठी यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, फौजदार हनुमंत नखाते, संजय मार्के, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, व्यापारी महासंघाचे शहाजी सूर्यवंशी, संदीप नरवाडे, डी. एस. कोल्हे, राजू जाधव, पंडित बोदमवाड, बाबुराव चव्हाण, सुरेश नांगरे तसेच आरोग्य विभागाची के. डी. सूर्यवंशी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे