esakal | 'राष्ट्रपती'चा पहिला वाढदिवस साजरा, संविधान पुस्तिकेची दिली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

'राष्ट्रपती'चा पहिला वाढदिवस साजरा, संविधान पुस्तिकेची दिली भेट

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण सोहळा आगळ्या - वेगळ्या पद्धतीने होत आहे त्यात "नाव" ठेवण्याची परंपराही अलीकडे वेगळीच झाली आहे. तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी तर मुलाचे नामकरण "राष्ट्रपती" केल्याने गतवर्षी चर्चेचा विषय ठरला होता. शनिवारी (ता.१९) राष्ट्रपतीचा पहिला वाढदिवस कुटुंबियांनी घरातच साधेपणाने साजरा केला.

अलीकडच्या काळात राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचे नाव बाळाला देण्यात येत आहे. पणजोबा, आजोबा, आजीचे नाव वाढवण्यासाठी प्रथाही अजून आहे. तालुक्यातील चिंचोली (जहागीर) येथील दत्ता चौधरी यांच्या कुटुंबात १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पुत्ररत्नाचा उत्साह होता, त्या बाळाच्या नामकरण कार्यक्रमात  श्री. चौधरी यांनी मात्र कल्पकतेने मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्याचा निर्णय घेतला. सोलापूर येथे जन्मलेल्या बाळाचे  महानगरपालिकेतुन "राष्ट्रपती दत्ता चौधरी" या नावाने जन्मप्रमाणपत्र त्यांनी घेतले. त्यानंतर या नावाचे आधारकार्डही काढून घेतले.

हेही वाचा: लातुरात सराफा व्यापाऱ्याच्या घरून दागिन्यांसह पिस्टलची चोरी

दरम्यान राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबात मुलाचे नाव राष्ट्रपती असावे या आशेतुन श्री. चौधरी यांनी मुलाचे नामकरण राष्ट्रपती केले असावे. आता राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदाचेही नामकरण झाले तर आश्वर्य वाटू नये. सर्वोच्च पदाचे नामकरण झाले म्हणजे त्याची गुणसंपन्नता प्रत्येकाच्या अंगी येईलच असे नसते मात्र नावाच्या प्रतिमेतुन त्या बालकाला प्रोत्साहन मिळावे असे पालकांना अपेक्षित असते पण त्यासाठी त्या बालकांचे स्वकर्तृत्वही तितकेच महत्वाचे असते. दरम्यान श्री. चौधरी व सौ. कविता चौधरी यांना मुलाचे नाव राष्ट्रपती असल्याचे कौतुक वाटते.

संविधान पुस्तिका दिली भेट-

वाढदिवसानिमित्त किशोर सुरवसे यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान पुस्तिकेची भेट राष्ट्रपती बालकास दिली. सरपंच रणजीत गायकवाड यांनी शिवछत्रपती चरित्र ग्रंथाची भेट दिली. पोलिस पाटील पद्माकर पाटील यांनी उपस्थित नागरिकांना मॉस्कचे वाटप केले. या वेळी चौधरी कुटुंबियांनी छोटेखानी भोजनाची मेजवाणी दिली. अमर पवार यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

" मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्यामागचा हेतू त्यातून प्रेरणा मिळण्याचा आहे,  भविष्यात मुलाला विविध क्षेत्राचे ज्ञान मिळावे, खडतर प्रयत्नातुन यशाचे शिखर गाठण्याची संधी मिळावी, शिवाय राष्ट्रभिमान असावा. मुलाच्या वाढदिवसाला सामाजिक उपक्रम घेण्याचा निश्वय होता मात्र कोरोनाच्या काळामुळे आणि आर्थिक स्थिती नाजूक असल्याने छोटेखानी कार्यक्रम घेतला.

-दत्ता चौधरी, पालक

loading image