#MarathaKrantiMorcha राजूर फुलंब्री मार्गावर रास्तारोको

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

'एक मराठा, लाख मराठा' आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन मंडळाधिकारी यांना देण्यात आले.

तळेगाव : राजूर फुलंब्री मार्गावर पिंपळगाव कोलते फाटावरती सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मंगळवारी (ता.7) सकाळी नऊ वाजेपासून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

'एक मराठा, लाख मराठा' आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन मंडळाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भोकरदन तहसीलचे कर्मचारी मंडळाधिकारी व तलाठी हे शासनातर्फे उपस्थित होते. रस्ता रोको आंदोलनामध्ये पिंपळगाव को, तळेगाव,प्रिंप्री,सावखेडा, तळणी आदी गावातील मराठा बांधव उपस्थित होते.

रास्ता रोकोमुळे फुलंब्री राजुर मार्गावरील वाहतूक दोन ते तीन तास ठप्प झालेली होती. रस्तारोको ठिकाणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. हसणाबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बिडवेंसह इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: Rastaroko on Rajur Phulambri Road