औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात रेशनकार्डअभावी लाभार्थ्य़ांची भटकंती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

दुष्काळीस्थितीत लाभार्थ्यांची धान्यअभावी उपासमार होत आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती होत असताना दुसरीकडे मात्र धान्याची मोठी परवड होत आहे.

सोयगाव (जि. औरंगाबाद) ः सोयगाव तालुक्यातील विविध योजनेच्या शिधापत्रिका दुकानदारांनी ऑनलाईन करण्याच्या नावाखाली संकलित करुन घेतल्याने रेशनकार्डअभावी लाभार्थ्य़ांना भटकंती करावी लागत असल्याची स्थिती सोयगाव तालुक्यात निर्माण झाली आहे.

दरम्यान एकीकडे रेशनकार्ड ऑनलाईन होईना व दुसरीकडे रेशनकार्ड हातात मिळत नसल्याने मोठी पंचायत झाली आहे. धान्यही नाही अन् शिधापत्रिकाही हातात नसल्याने सोयगाव तालुक्यातील लाभार्थ्यांची तेल गेले तुप गेले, अन हाती धुपाटणे आले अशी स्थिति झाली आहे.

दुष्काळीस्थितीत लाभार्थ्यांची धान्यअभावी उपासमार होत आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती होत असताना दुसरीकडे मात्र धान्याची मोठी परवड होत आहे.

Web Title: ration card problem in soygaon Aurangabad

टॅग्स