लातूर : राऊत कुटुंबाने दिले नवजात हरणाच्या पाडसाला जीवदान (Video)

deers.jpg
deers.jpg

औसा : नागरसोगा (ता. औसा) जिल्हा लातूर येथील संभाजी राऊत यांच्या कुटुंबामुळे हरणाच्या पाडसाला जीवदान मिऴाले आहे.

नागरसोगा येथील संभाजी राऊत यांच्या शेतात दहा दिवसांपूर्वी एका हरणाने पाडसाला जन्म दिला. मात्र आईच्या पोटातून हे पाडस बाहेर येताच कुत्रे या हरणाच्या मागे लागले. नवजात पाडसाला सोडून जीव वाचविण्याच्या धडपडीत या पाडसाची आई त्याला सोडून गेली. या पाडसालाही कुत्रे चावा घेण्याच्या पवित्र्यात होते मात्र त्या ठिकाणी असलेल्या मालनबाई राऊत आणि अमृत राऊत यांनी कुत्र्यांच्या तावडीतून या पाडसाला सोडविले.

दरम्यान, भेदरलेल्या या पाडसाला त्यांनी जवळ घेतले...आता हे पाडस कोठे जाईल आणि हे सुरक्षित राहील का याची चिंता त्यांना सतावू लागली. दुसरी चिंता या पाडसाला दूध पाजायची त्यांच्या समोर होती. मात्र 'देव तारी त्याला कोण मारी?' या उक्तीप्रमाणे त्याच दिवशी राऊत यांची गाय व्याली आणि तेच कच्चे दूध या पाडसाला सूट झाले.

राऊत कुटुंबांनी दोन दिवस हरणी येईल याची वाट पाहिली मात्र ती आली नाही त्यामुळे त्यांनी या पाडसाचा सांभाळ गाईचे दूध बाटलीत भरून त्याला ते दूध पाजत घ्यायला सुरुवात केली. गेल्या दहा दिवसांत या कुटुंबांनी या पाडसाची नवजात बाळाप्रमाणे काळजी घेतल्याने या पाडसाने आता चांगलेच बाळसे धरले आहे.  आणि या पाडसाला पण राऊत कुटुंबाचा चांगलाच लळा लागल्याचे दिसून येत आहे. काही दिवस त्याचा सांभाळ करून हे हरणाचे पिल्लू वन विभागाच्या हवाली करण्यात येणार असल्याचे मालन राऊत यांनी सकाळशी बोलताना सांगितले
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com