रवींद्र गायकवाडांनी केली ओमप्रकाश राजेनिंबाळकरांविरोधात तक्रार

अविनाश काळे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

उमरगा : शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून बदनामी करून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मंगळवारी (ता. 16) उमरगा पोलिस ठाण्यात दुपारी दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने राजेनिंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजेनिंबाळकर यांनी व्हिडीओ क्लिप काढून व्हॉट्सअपवर प्रसारित केली, त्यातुन आपली बदनामी केली. त्यामुळे आपली राजकीय  प्रतिमा मलीन झाल्याचे खासदार प्रा. गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत खासदार प्रा. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोवर्धनवाडी येथील राजेनिंबाळकर यांनी व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडियो क्लिप व्हायरल करीत अभद्र बोलून हेतुपुरस्सर अपमान केला, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, जनसामान्यात माझी प्रतिमा मलीन केली.

दहा टक्के निधी राष्ट्रवादीला दिला, अशा प्रकारच्या मजकुराचे व्हीडीओ करून संपूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रसारित करुन बदनामी केली. त्यामुळे जनमाणसात माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. या तक्रारीनुसार उमरगा पोलिस ठाण्यात राजेनिंबाळकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान मतदान दोन दिवसांवर आले असताना खुद्द खासदारांनीच शिवसेना उमेदवारविरूद्ध तक्रार दिल्याने याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

Web Title: Ravindra Gaikawad filed complaint against Omprakash nimbalkar