

After months of tension, BJP leaders Ravsaheb Danve and Babanrao Lonikar finally come together, creating a fresh buzz in Maharashtra’s political landscape.
Sakal
जालना : एकाच पक्षात राहून जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचा सवतासुभा निर्माण करणारे, दोन राजकीय कट्टर विरोधक अखेर दशकानंतर एकत्र आले आहेत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील राजकीय वाद मिटल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केला आहे. दरम्यान, या नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र बदलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.