पिठ्या ढेकणापासुन सीताफळाचे संरक्षण करण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी

डॉ. धीरजकुमार कदम/ विलास खराडे
Friday, 6 November 2020

फळबागेकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्याला सरकार अनुदानही देते. मात्र, फळबागांचे व्यवस्थापन योग्य झाले नाही तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. हवामानानुसार व शेतीच्या प्रकारानुसार वेगवेळ्या ठिकाणी फळबागा केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे सीताफळ!

फळबागेकडे सध्या शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्याला सरकार अनुदानही देते. मात्र, फळबागांचे व्यवस्थापन योग्य झाले नाही तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. हवामानानुसार व शेतीच्या प्रकारानुसार वेगवेळ्या ठिकाणी फळबागा केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे सीताफळ! सिताफळाच्या फळबागेचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे प्रा. डॉ. धीरजकुमार कदम आणि विलास खराडे यांनी सल्ला दिला आहे.

पिठ्या ढेकूण (मिलीबग) ही कीड झाडाच्या सालीच्या खाली, फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते. चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थांच्या आवरणामध्ये ती अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही मेणचट पांढऱ्या रंगाचे आवरण असते. कापसासारख्या पांढऱ्या पदार्थांच्या आवरणामध्ये ती अंडी घालते. पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरही रंगाचे आवरण असते. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

किडीची ओळख आणि जीवनक्रम कसा आहे
शरीर अंडाकृती असून रंग पांढरा, लालसर असतो. डोके आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात, मादी सैलसर कापसासारखी असून ती जवळपास सहाशे अंडी घालते. अंडी वाढत्या शेंड्यावर, फळावर, फळाखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात. अंडी अंडाकृती, नारंगी रंगाची असतात. पिल्ले अंड्यातून संथपणे सरपटणारी नारंगी व विटकरी लाल रंगाची पिल्ले बाहेर पडतात. पूर्ण झाडावरती पसरतात. पिल्ले फळे व कोवळ्या फांद्यावर थांबतात. या अवस्थेत किडीवर पांढऱ्या रंगाचा मंचक पदार्थ नसतो. त्यामुळे कीटकनाशकांचा योग्य परिणाम होतो. किडीची एक पिढी सरासरी तीस दिवसात पूर्ण होते. एका वर्षात जवळपास 12 ते 15 पिढ्या पूर्ण होतात.

कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवतो
नुकसानीचा प्रकार पिल्ले व प्रौढ पाने यातून रस शोषण करतात. परिणामी पानांचा, फळांचा आकार वेडावाकडा होतो. त्यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नवीन फुटींची व पानांची वाढ खुंटते. फळांची वाढ अयोग्य होऊन आकार वेडावाकडा होतो. कीड शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ स्त्रवतो. त्यावर काळी बुरशी वाढते, परिणामी पाने व फळे काळी पडतात. फळांना बाजारभाव मिळत नाही.

सिताफळाच्या झाडाभोवती अन्य पिक घेउ नये
एकात्मिक किड नियंत्रण जमिनीची खोलवर नांगरट करावी, जमीन उन्हात चांगली तापू द्यावी, त्यामुळे जमिनीत असणाऱ्या किड नष्ट होतात. पिठ्या ढेकूण झाडावर चढू नये यासाठी पंधरा ते वीस सेंटिमीटर रुंदीचे प्लास्टिक पट्टी ग्रीस लावून खोडावर बांधावी. पिठ्या ढेकूण सरपटत त्यांना चिकटून मरतात.बागेभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. कापूस पिकावर ही कीड मोठ्या प्रमाणावर वाढते. परभक्षी मित्र कीटक क्रिप्टोलिमस मॉन्टरोझायरी प्रतिक्रिप्ट सहाशे या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा बागेत झाडावर सायंकाळच्या वेळी सोडावेत. कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची बागेवर फवारणी करू नये. आर्द्रतायुक्त हवामान असल्यास व्हर्टिसिलियम लेकॅनी हे जैविक कीटकनाशक अधिक चार ग्रॅम फिश ऑइल रोजी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

फवारणी प्रति लिटर पाणी
बुप्रोफेझिन २५.२ मिली अधिक फिष ओईल रोजी ड्रॉप १५ मिली किंवा दोन मिली प्रति लिटर पाणी अधिक सोप अडीच मिली वरील प्रमाण पंपासाठी असून आवश्यकता भासल्यास दुपारी दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे प्रा. डॉ. धीरजकुमार कदम आणि विलास खराडे यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read the advice of agronomists for the management of custard apple