esakal | भन्नाट आयडिया : स्क्रिनवर वाचा पुस्तके अन घरीच बसा
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शासनस्तरावरही प्रयत्न केले जात आहेत. दयानंद भजनी मंडळातील एका सदस्याने अनोखा फंडा वापरून चक्क ग्रुपमर ‘ई-बुक्स’च्या पीडीएफ फाईल टाकून वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.

भन्नाट आयडिया : स्क्रिनवर वाचा पुस्तके अन घरीच बसा

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शासनाला हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १४४ सारखे कलम लावून नागरिकांनी घरातच थांबण्याचे आवाहन करत आहे. त्यासाठी सोशल मिडियावर विविध पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्सची देवाण-घेवाण करून घरीच स्क्रीनवर पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला जात आहे.

प्रत्येकाच्या हातात विविध प्रकारचे फोन्स आल्याने एकमेकांशी संवाद संपला. त्यासोबतच वाचनसंस्कृतीही लुप्त झाली आहे. दिवस-रात्र व्हाट्‍सॲप, ट्विटर, फेसबुकवरती ज्येष्ठांसह युवावर्गदेखील गुंतून गेला आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थीही यात मागे राहिलेले नाही. बच्चेकंपनीतर मोबाईलवर सर्रासपणे गेम्स खेळण्यात दंग होत असल्याने मैदानी खेळही दुरापास्त होताना दिसत आहे. परिणामी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अशा सर्वांनाच विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव सध्या बघायला मिळत आहे. 

हेही वाचा - सोशल मीडियावरील सल्ले ठरताहेत लाभदायी - कसे ते वाचा...

वाचन संस्कृती रुजावी म्हणून...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला अखेर सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) संचारबंदी लावावी लागली. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबणे अनिवार्य आहे. मात्र, गत तीन ते चार दिवसांपासूनच सोशल मिडियावरून वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. घरात बसून काय करायचे; तर स्क्रिनवर पुस्तके वाचा’ अशा प्रकारचे संदेश देत पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्य व्हाट्‍सअपवरून एकमेकांना शेअर केल्या जात आहेत. बंदच्या काळात तरी नागरिकांना पुस्तक वाचनाची सवय लागेल, हा यामागील प्रामाणिक हेतू आहे.  

ज्येष्ठांसह बच्चे कंपनी गेममध्ये व्यस्त
शाळांना सुट्या. शिकवणीवर्गही नाही. पहिली ते आठवीच्या परीक्षाही रद्द. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, कोरोनाची धास्ती त्यांच्या मनामध्ये लागून आहे. त्यामुळे घराच्या बाहेर निघायचे नाही, असा घरच्यांचा दंडक असल्याने बच्चे कंपनी दिवसभर व्हिडिओ गेम्स, मोबाईलवरील गेम्स खेळण्यात व्यस्त रहात आहेत. एवढेच नाहीतर ज्येष्ठमंडळीही या बच्चेकंपनींसोबत विविध गेम्सचा आनंद घेत आहेत. महिलावर्ग एखाद्या मैत्रीणींच्या घरामध्ये एकत्र येवून गप्पागोष्टीमध्ये दिवस काढत आहेत. 

येथे क्लिक करा - पालकांसह मुले रमली बैठे खेळात

‘यांचा’ आहे पुढाकार
दयानंद भजनी मंडळ ग्रुपमधील सदस्य ग्रामसेवक श्री. घुले यांनी सुट्ट्यांच्या काळामध्ये वाचनप्रेरणा रुजविण्यासाठी सर्वांना ‘ई-बुक’च्या पीडीएफ फाईल्स पाठवल्या. यामध्ये ‘घर हरवलेली माणसं’,  ‘चकाट्या’, ‘झोपाळा’, ‘दोस्त’, ‘काळी जोगीण’, ‘जादी तेरी नजर’, ‘पाणपोई’, मोसाद’, ‘तनमन’, ‘मध्यरात्र’, ‘धागे’, ‘युगंधर’, ‘राधेय’, ‘छावा’ आदी १४  ई-बुक्सचा समावेश आहे.   

loading image