व्यापाऱ्यांना मेसेजद्वारे महासंघाने केल्या सूचना, कोणत्या ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’ संसर्गामुळे टाळेबंदीची घोषणा (ता. २३) मार्चपासून केली आहे. परंतु, या टाळेबंदी दरम्यान परभणी शहरात किंवा जिल्ह्यात कोरोनाने अद्यापतरी शिरकाव केला नाही. तरीही व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाणे उघडी करत असताना योग्य त्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

परभणी ः केंद्र शासनाने ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे केलेली टाळेबंदी जर अकरा मे रोजी खुली होणार असेल तर व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करूनच आपापली प्रतिष्ठाणे उघडायची आहेत, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा व्यापारी महरासंघाच्या वतीने व्यापाऱ्यांना एका मेसेजद्वारे या सूचना केल्या आहेत.
       

संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’ संसर्गामुळे टाळेबंदीची घोषणा (ता. २३) मार्चपासून केली आहे. परंतु, या टाळेबंदी दरम्यान परभणी शहरात किंवा जिल्ह्यात कोरोनाने अद्यापतरी शिरकाव केला नाही. तरीही व्यापाऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाणे उघडी करत असताना योग्य त्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

हेही वाचा - युवकाने मदतीतून श्रमजिवी लोकांचा स्वाभिमानही जपला, कुठे ते वाचा...

सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक
यदा कदाचित ता. ११ मेला जर टाळेबंदी उठली तर व्यापाऱ्यांनी आधी ‘कोरोना’पासून सुरक्षा कशी करायची याचा पूर्ण अभ्यास करून घ्यावा. आपापली व्यवस्था करूनच दुकाने चालू करायची आहेत. केंद्र सरकारने माहिती दिल्याप्रमाणे सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यात सुरक्षित अंतर ठेवणे, संपूर्ण दुकान आधी निर्जंतूक करणे, येणारे ग्राहक मास्क घालून व निर्जंतूक करून आत घ्यावेत, शक्य झाल्यास डिस्पोजल हॅँडग्लोज द्यावेत, ग्राहकांना गर्दी करू नका, अशी विनंती करावी, दुकानात एक व्यक्ती सतत बाहेर ठेवावा, जेणेकरून तुम्हाला एक एक ग्राहक दुकानात सोडता येईल, शक्य झाल्यास दुकानात एक ग्राहक नोंद रजिस्टर ठेवणे, नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेणे.

हेही वाचा - पंकजा मुंडेंची उमेदवारी टळली; काय आहेत कारणं, काय होईल परिणाम

नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे
सोने, चांदी व्यापारी यांना विशेष सूचना कोणताही दागिना ग्राहकांना त्यांच्या हातात न देता फक्त समोर ठेवून पसंद करण्यास सांगावे, सलूनमध्ये कामकाज करणारे यांना मास्क, हॅँडग्लोज, सॅनिटायझर, डेटॉल देने, एक - एक करून ग्राहक करणे या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिव सचिन अंबिलवादे व कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read The Instructions Given By The Federation To The Traders Through Messages, Which Ones, parbhani news