स्त्रीया का घालतात पैंजण  - वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

महिलांचे जस जसे वय वाढते तसे त्यांच्यातले कॅल्शिअम कमी होण्यास सुरुवात होते. कॅल्शिअमची कमतरता अनेक दुखापतींना कारणीभूत ठरते. त्यामुळे ज्यांच्यामध्ये अगोदरच कॅल्शिअम कमी आहे त्यांनी पैंजण घालायलाच हवे. 

नांदेड : पैंजण घातल्याने लुक ॲक्टिव्ह तर दिसतोच पण स्त्रीयांच्या पायांचे सौंदर्यही वाढते. या व्यतिरिक्त सोने किंवा चांदीचे पैंजण घातल्यास हाडे मजबूत होतात. पैंजणाच्या धातूतील तत्व त्वचेच्या मार्गाने शरीरात जाऊन हाडांना मजबूत करतात. महिलांचे जस जसे वय वाढते तसे त्यांच्यातले कॅल्शिअम कमी होण्यास सुरुवात होते. कॅल्शिअमची कमतरता अनेक दुखापतींना कारणीभूत ठरते. त्यामुळे ज्यांच्यामध्ये अगोदरच कॅल्शिअम कमी आहे त्यांनी पैंजण घालायलाच हवे. 

दरम्यान पैंजन सौदर्यांचे प्रतीक म्हणून वापरात असले तरी, या मागील शास्त्रीय कारणं आहेत. ज्या महिलांना पाय सुजण्याची समस्या आहे त्यांनी चांदीचे पैंजण घातल्यास फायदा होतो. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते आणि नैसर्गिकरित्या पायांचे सुजणेही थांबते. शरीरात रक्ताभिसरण चांगले असेल तर त्वचा सुंदर होते, चेहेऱ्यावर तेज येते आणि हृदयरोगांपासूनही संरक्षण होते.

हेही वाचापुरस्कारामुळे सांस्कृतिक वैभवात भर

विद्युत ऊर्जा टिकवून ठेवा 
पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरातच सुरक्षित साठवून ठेवते.  विदयुत ऊर्जा शरीरात सुद्धा असते. आपल्या शरीरातल्या पेशी वद्युत ऊर्जा वाहून नेण्यास सक्षम असतात. शरीरात वद्युत ऊर्जा ही नर्वस सिस्टिमला मेंदूपर्यंत सिग्नल पोचवण्यासाठी आवश्यक असते. ज्यामुळे आपण हालचाल, विचार आणि फील करू शकतो. आपल्या शरीरातील पोटॅशिअम, कॅल्शिअम, आणि मॅग्नेशिअममध्ये काही विशिष्ट विद्युत ऊर्जा असते; ज्याला ईऑन्स (ions) असेही म्हणतात. जवळपास सर्वच पेशी यांनचा उपयोग विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी करतात.

चरबीला ठेवते नियंत्रणात 
पैंजण पोटावर आणि त्या खालच्या भागावर चरबी वाढण्याचा वेग कमी करते. शरीरात अतिरिक्त चरबी वाढणं स्थूलपणाचं लक्षण असतं. चरबी वाढल्याने आपली गती कमी होते. झोप जास्त लागते आणि माणूस आळशी बनतो. परिणामी, तरुण वयातच आपण म्हातारे झाल्याचे दिसते. बाहेरचे खाल्ल्यामुळे तर चरबी अजूनच वाढत जाते. पैंजण घातल्यास चरबी वाढण्याचा वेग कमी होतो.   

येथे क्लिक करामहिलांनी भजन गायनाला दिली सामाजिकतेची झालर

नकारात्मक उर्जेस ठेवा दूर 
वास्तूच्या अनुसार पैंजणामुळे होणारा आवाज निगेटिव्ह ऊर्जेस दूर ठेवतो. पैंजणामधून येणारा आवाज जर तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला कळेल कि तो देवघरात असणाऱ्या घंटेसारखा येतो. ज्यामुळे आसपासच्या परिसरातील अशुद्ध वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. हेच काम पैंजण करतं. चालता फिरता पैंजणाचा मधुर आवाज कानावर पडतो आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. पायात पैंजण घातल्याने महिलेची इच्छा शक्ती मजबूत होते. हेच कारण आहे कि,  महिला आपल्या आरोग्याची चिंता न करता आपल्या कुटुंबाचं पालनपोषण न थकता करत असतात. त्यामुळे सौंदर्याचे प्रतिक म्हणून वापरात असलेले पैंजन स्त्रीच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read More About why Women Wear Tights - Nanded News