esakal | हिंगोलीकरांना पुन्हा मिळाला दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

korona

येथील जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात तीन रुग्ण दाखल आहेत. यातील (वय ४९) रुग्णाचा अहवाल गुरुवारी (ता.दोन) औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. 

हिंगोलीकरांना पुन्हा मिळाला दिलासा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना संशयित एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती मंगळवारी (ता.सात) जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. दरम्यान, निगेटिव्ह अहवाल आलेल्या सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून रुग्णालयात केवळ दोन रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात तीन रुग्ण दाखल आहेत. यातील (वय ४९) रुग्णाचा अहवाल गुरुवारी (ता.दोन) औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. त्‍याची प्रकृती स्‍थीर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. तसेच दुसरा (वय ३८) संशयित रुग्ण कोरोना संसर्ग असलेल्या शहरातून आला असून त्‍याची प्रकृती स्‍थीर आहे.

हेही वाचाट्रकचालकांच्या मदतीला आला ‘जनता चहल ढाबा’

कोविड रुग्णांच्या सहवासातील व्यक्‍ती

 कुणाल्याही गंभीर प्रकारची लक्षणे नाहीत. या रुग्णाचा अहवाल औरंगाबाद येथून निगेटिव्ह आला आहे. तसेच तिसरा रुग्ण (वय २९) कोविड रुग्णांच्या सहवासातील व्यक्‍ती आहे. त्याची प्रकृती स्‍थिर आहे. कुणाल्याही गंभीर प्रकारची लक्षणे नाहीत. या रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, येथील आयसोलेशल वार्डात एकूण २० संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

रुग्णालयातून देण्यात आली सुटी

यातील एकूण १८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात एक कोरोना पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल प्रलंबित असलेला रुग्ण दाखल असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. तसेच परदेशातून आलेल्या व घरात विलगीकरण करण्यात आलेल्या ११ व्यक्‍तींचा १४ दिवसांचा होम क्‍वारंटाइनचा कालावधी संपला असल्याचे त्यांनी सांगितले.

येथे क्लिक कराकेळीला मिळतोय केवळ अडीचशे रुपये भाव

अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सेनगाव : पुणे येथून आलेल्या व्यक्तीस कोरोना झाल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी कवठा (ता. सेनगाव) येथील एकाविरुद्ध सोमवारी (ता. सहा) गुन्हा दाखल झाला आहे. कवठा येथील व्यक्‍ती पुणे येथून आली आहे. त्याने कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कारोनासंदर्भात तपासणी करून घेतली असता कोरोनासंदर्भात आजार नसल्याचे आढळून आले. तरीदेखील पोलिस पाटील यांचे पती पंडित गाढवे यांनी गावात खोटी अफवा पसरविली.

अफवा पसरविल्यास कारवाई

 पुणे येथून आलेला व्यक्ती कोरोना रुग्ण असून त्‍याला कोणी बोलू नका, त्‍याचे किराणा दुकानावर कोणी जाऊ नका, अशी बदनामी करून अफवा पसरविली. यावरून सोमवारी सेनगाव पोलिस ठाण्यात पंडित गाढवे याच्या विरुद्ध आपती व्यवस्‍थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना संदर्भात व्हॉट्सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवू नये, अफवा पसरविल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांनी दिला आहे.

loading image