Dr. Prashant Patare
sakal
शेंदूरवादा - अहिल्यानगर येथील मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले प्रसिद्ध रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ तथा गंगापूर सहकारी साखर कारखाना, पैठण सहकारी साखर कारखाना, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग चितेपिंपळगाव आणि मुक्तेश्वर शुगर मिल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहून आपल्या कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे ए. बी. पटारे यांचे चिरंजीव डॉ. प्रशांत पटारे यांनी एका दिवसात तब्बल १६ रोबोटिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.