esakal | कर्जमाफीआधीच व्याजाची वसुली!
sakal

बोलून बातमी शोधा

 Recovery Of Interest Before Debt Crop Loan Waiver! Marathwada News

कर्जमुक्ती योजनाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत जिल्हा बँक, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थानी व्याजाची आकारणी करू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने बँकांना केल्या आहेत. 

कर्जमाफीआधीच व्याजाची वसुली!

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद  : महाविकास आघाडी सरकारतर्फे शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्यात आली आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीच्या रक्कमा जमा झालेल्या नाही, अशा शेतकऱ्यांकडुन जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे व्याज वसूल करण्यात येत आहे. ही व्याज वसुली थांबवा, अशा सूचना विभागीय सहनिबंधकातर्फे बुधवारी(ता.१७) जिल्हा बँकेला करण्यात आल्या, याविषयीचे पत्र विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहे. 


कर्जमुक्ती योजनाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत जिल्हा बँक, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्थानी व्याजाची आकारणी करू नये, अशा स्पष्ट सूचना राज्य शासनाने बँकांना केल्या आहेत. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

कर्जमुक्ती योजने अंतर्गत लाभार्थ्यांस लाभाची रक्कम प्राप्त होईपर्यंत व्याज वसूल न केल्यास बँकेचे व प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सदर नुकसान सहन करण्या इतपत बँकांनी, संस्थांची आर्थिक सक्षम नाहीत. याकरिता १ ऑक्टोबर २०१९ ते प्रत्यक्ष लाभ होईपर्यंत बँक धोरणानुसार व्याज आकारणी करण्यात यावीत, असा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने २२ जानेवारी रोजी झालेल्या सभेत घेतला होता. तेव्हापासून कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ न मिळू शकलेल्या शेतकऱ्यांनाकडून जिल्हा बँकेतर्फे व्याजाची सक्तीने वसुली केले जात आहे. यासह पीक कर्ज वाटपही थांबवले होते. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल 
याविषयी "मी पैठणकर' या संघटनेच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील किशोर तांगडे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधकांनी याची दखल घेत बुधवारी (ता.१७) वरील आदेश काढले. शासनाकडून येणाऱ्या रक्कमेवर जिल्हा बँकेने एक एप्रिलपासून त्यांना प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंतचे व्याज आकारणी करावे. संबंधित बँकेत शासनाकडून असा निधी व्याजासह देण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहेत. 

जिल्हा बँकेतर्फे नियमबाह्य व्याज वसुली सुरु आहे. याविषयी आम्ही सचिवापासून ते सहकार आयुक्त पर्यंत पाठपुरावा केला. आज याची दखल घेण्यात आली. आदेश निघेपर्यंत बुधवारी(ता.१७) बिडकीन परिसरात बँकेने विठ्ठल बडे या शेतकऱ्यांकडून ४ हजार८८० रुपये व्याज वसूल केले आहेत. 
-किशोर तांगडे, तक्रारदार 

loading image
go to top