धुळे जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाची तीन कोटीची दंडात्मक वसुली

जगन्नाथ पाटील 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

प्रादेशिक परीवहन कार्यालय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहते. पण एखादा अधिकारी बदलल्यानंतर शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी आल्यास कामात शिस्त येते. सध्या अशीच शिस्त प्रादेशिक परीवहन कार्यालयात पाहायला मिळत आहे. वाहतूकीला शिस्त लावण्यासाठीही विविध प्रयत्न केले जात आहेत.

कापडणे : धुळे प्रादेशिक परीवहन कार्यालयाने विविध प्रकारच्या दोषी वाहनांवर कारवाई करण्याचा बडगा कडक गेला आहे. वाहतुकीला शिस्त लागावी. ओव्हरलोढ वाहतूक कमी व्हावी. यासाठी वायुवेग पथक मोठी कामगिरी करीत आहे. 2017-18 या वर्षात दंडातून तब्बल 3 कोटीचा आणि एप्रिल ते जून या चार महिन्यात 1 कोटी 20 लाखाचा महसुल सरकार दरबारी जमा केला आहे. या पुढील काळातही कडक कारवाईसाठी हा विभाग सज्ज झाला आहे.

2017-18 मध्ये तीन कोटीची दंड आकारणी
प्रादेशिक परीवहन कार्यालय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहते. पण एखादा अधिकारी बदलल्यानंतर शिस्तप्रिय व प्रामाणिक अधिकारी आल्यास कामात शिस्त येते. सध्या अशीच शिस्त प्रादेशिक परीवहन कार्यालयात पाहायला मिळत आहे. वाहतूकीला शिस्त लावण्यासाठीही विविध प्रयत्न केले जात आहेत. 2017-18 या आर्थिक वर्षात सात हजार तीनशे दोन दोषी वाहनांवर कारवाई केली आहे. यात दोनशे त्रेसष्ट ओव्हरलोड वाहने होती. त्यांच्यावरील कारवाईतून 79 लाख 11 हजार चारशे पन्नास एवढा दंड वसुल झाला आहे. तर इतर वाहतूक गुन्ह्यांमधून तब्बल 2 कोटी 6 लाख 89  हजाराचा महसुल गोळा झाला आहे. वर्षभरात 2 कोटी 86 लाख चारशे महिना एवढा दंड वसुल झाला आहे.

चार महिन्यात सव्वा कोटीचा दंड
2018 च्या एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यातही या विभागाने कारवाईचा कडक पवित्रा अंगिकारला आहे. चार महिन्यात एक हजार बारा दोषी वाहनांवर कारवाई झाली आहे. यात एकशे सव्वीस ओव्हरलोड वाहनांचा समावेश आहे. त्यांच्यावरील कारवाईतून 14 लाख 85 हजाराचा दंड वसील झाला आहे. तर इतर वाहतूक गुन्ह्यांमधून 1कोटी 4 लाख 92 हजार शुल्क जमा झाले आहे.

ओव्हरलोड वाहतूकीवर मर्यादा...
जिल्ह्यासह राज्यातील सीमा शुल्क वसुली नाक्यांवर आधुनिक वजन काटे बसविण्यात आले आहेत. परीणामी ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे त्यातून होणार्‍या अपघातांचे प्रमाण कमी झालेले आहे.

चार्ट -
वर्ष     / दंडात्मक दोषी वाहने/ ओव्हरलोड वाहने/ दंडात्मक वसुली
2017-18 /  7039 / 263 / 28600400 
एप्रिल ते जुलै/ 1012 / 126 / 10492000

जळगाव, नंदूरबार व धुळे असे तीन जिल्ह्यांचा नियंत्रक अधिकारी व धुळ्याचा प्रादेशिक परीवहन अधिकारी आहे. पाच सीमा तपासणी नाके आहेत. परीवहन आयुक्तांच्या विविध बैठकांना उपस्थित रहावे लागते. कामाचा मोठा व्याप असूनही कार्यालयाला पुर्णवेळ देवून विविध समस्यांचे निराकरण करीत असतो. - पी. के. तडवी, प्रादेशिक परीवहन अधिकारी

Web Title: Regional Transport Department has received fine of Rs Three crores in Dhule district