‘सकाळ’वर विश्‍वासार्हता; महिलांचा ‘सकाळ’ अपडेटग्रुप ...

file photo
file photo

परभणी : ‘सकाळ’ म्हणजे विश्वास... ‘सकाळ मध्ये बातमीतील सत्यता... अशी ‘सकाळ’ माध्यम समुहाची ओळख पहिल्यापासूनच आहे. परंतू, आता कोरोना विषाणुच्या संसर्गानंतर केलेल्या विविधांगी बातम्याच्या वार्ताकंनातही ‘सकाळ’ म्हणजे संकटाच्या काळी वाचकांची विश्वासहर्ता जपणारे माध्यम, अशी ओळखही होऊ लागली आहे.

पाथरी (जि.परभणी) येथील ६० महिलांनी मिळून फक्त ‘सकाळ’च्या ऑनलाईन बातम्यासाठी व्हॉटसअप ग्रुप तयार करून ‘ई सकाळ’च्यावतीने देण्यात येणाऱ्या ऑनलाईन बातम्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

जगभरात ‘कोरोना’ विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे. आपला देशही त्यातून सुटला नाही. देशातील प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात ‘कोरोना’ विषाणुचे रुग्ण आढललेले आहेत. दुर्देवाने महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. परंतू, या अतिशय गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे सरकारच्या पाठीमागे उभी आहे. सरकारने दिलेल्या प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या विषाणुच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. 


याचा परिणाम प्रिंट मिडियावरदेखील पहावयास मिळाला. परंतू, राज्यात सातत्याने ऑनलाईन बातम्या मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘ई सकाळ’ने वाचकांपर्यंत जगाची, देशाची व आपल्या राज्याची परिस्थितीती ‘ई सकाळ’च्या माध्यमातून पोहचविण्याची जबाबदारी स्विकारली. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणु संदर्भात प्रत्येक बातमी ‘ई सकाळ’ च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरु आहे.


६० महिलांचा ‘व्हॉटअस ग्रुप’
 ‘सकाळ’ वरील विश्वाहर्ता व्यक्त करत पाथरी येथील शिक्षिका दुर्गा चौव्हान यांनी पाथरीमधील ६० महिलांचा एक ‘व्हॉटअस ग्रुप’ तयार केला. त्यांनी ‘सकाळ’च्या परभणी कार्यालयाशी संपर्क साधून आम्हाला फक्त ‘सकाळ’च्या ऑनलाईन बातम्या किंवा अपडेट मिळतील का?, अशी विनंती केली. त्यानंतर ‘कोरोना’ विषाणु प्रादुर्भाव झाल्यानंतर ते आजतागायत या ग्रुपवर केवळ ‘ई सकाळ’ च्याच बातम्या वाचल्या जात आहेत. विशेष म्हणजे ज्या काही पॉझीटीव्ह किंवा महत्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या सदरील महिला त्यांच्या इतर ग्रुपवर ही फिरवत आहेत. यावरून संकटाच्या या काळात पाथरीतील महिलांनी ‘सकाळ’वरील विश्वास जाहीरपणे व्यक्त केला आहे.
 

‘सकाळ’ म्हणजेच खरी बातमी
मी अनेक वर्षापासून ‘सकाळ’ची वाचक आहे. त्यात मला ‘सकाळ’चे सामाजिक उपक्रम आवडतात. ‘ई सकाळ’ची वाचकही आहे. शाळेत रिकाम्या वेळी ‘सकाळ’चे ॲप पाहत असते. या संकटाच्या काळात अनेक फसव्या बातम्यांनी आम्हा महिलांना विचलित केले होते. परंतू आमचा ‘सकाळ’वर विश्वास असल्याने आम्ही महिलांनी मिळून हा ग्रुप सुरु केला आहे. जगात घडत असणाऱ्या घटना, सद्य परिस्थिती व इतर बाबतीत खऱ्या बातम्या आमच्या पर्यंत ‘ई सकाळ’ पोहचवित आहे. त्यामुळे ‘सकाळ’ परिवार, ‘ई सकाळ’चे आम्ही आभार व्यक्त करतो.
- दुर्गा चौव्हान, शिक्षिका, पाथरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com