esakal | कोरोनाच्या भितीने शंभर कुटुंबाचा जिव टांगणीला
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

श्रीमती मोरे राहतात. त्या एसटी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती मुंबई येथे जॉब करतात. ते शुक्रवारी (ता.२७ मार्च २०२०) संध्याकाळी एसटी महामंडळच्या क्वॉर्टरमध्ये असलेल्या पत्नीकडे आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली.

कोरोनाच्या भितीने शंभर कुटुंबाचा जिव टांगणीला

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोनाचा शिरकाव होणार नाही या हेतुने देश, राज्य आणि त्या - त्या जिल्ह्यात सिमा बंदी करण्यात आली आहे. सिमाबंदीमुळे २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बस, रेल्वे आणि खासगी वाहनांची सुविधा देखील बंद करण्यात आल्या आहेत. अशात जर कुणी नव्याने शहरात दाखल झालेच तर, अनेकांच्या अंगाचा थरकाप होताना दिसून येतो.

नांदेड वर्कशॉप कॉर्नर येथे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टर्स आहेत. याच कॉर्टरच्या एक नंबरच्या बिल्डींगमध्ये चौथ्या माळ्यावर श्रीमती मोरे राहतात. त्या एसटी वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती मुंबई येथे जॉब करतात. ते शुक्रवारी (ता.२७ मार्च २०२०) संध्याकाळी एसटी महामंडळच्या क्वॉर्टरमध्ये असलेल्या पत्नीकडे आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ‘आता कोण आलाय’ म्हणून अनेकांनी एक मेकांकडे विचारपुस केली. फोनवरुन माहिती घेतली. या सांगोपांगी माहितीमुळे अनेक कुटुंबातील सदस्य रस्त्यावर जमा झाले. कॉर्टरमधील रहिवाशांनी पोलीसांना फोन केला. पोलीस आले मात्र, त्या कर्मचारी महिलेने नवऱ्याला बाहेर न पडु देता पोलीसांच्या प्रश्नांची उतरे दिली. 

पोलीस देखील वरवर चौकशी करुन निघुन गेले. मात्र एसटी महामंडळाच्या कॉर्टरमधील रहिवाशांचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठल्यावर पुन्हा रहिवाशांनी कोरोना संबंधी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधला आणि मुंबईहून आमच्याकडे एक व्यक्ती आल्याची माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून देखील फारशी दखल घेतली गेली नसल्याने कॉर्टरमधील रहिवाशांनी चांगलीच धास्ती घेत दरवाजा उघडणेच बंद केले. 

हेही वाचा- video - ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’

इथे ४०० रहिवाशी​
वर्कशॉप येथे एसटी महामंडळाच्या एकुण चार इमारती आहेत. प्रत्येक इमारत ही चार माळ्याची आहे. एका इमारतीमध्ये २४ रहिवाशी असतात. अशा चार इमारतीमध्ये मिळुन जवळापास ९० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. त्यांचे कुटुंब सदस्यांची संख्या सरासरी चार इतकी धरली तरी, इथे ४०० रहिवाशी राहत असल्याचे समजते.

 हेही वाचलेच पाहिजे- संकट समयी सरसावले शेकडो ‘हात’

 त्या व्यक्तीची कोरोना तपासणी बद्दल शंका
रहिवाशी इतके घाबरलेले असताना  याबद्दलची विभागीय अधिकारी यांना पुसटशी कल्पना देखील नसल्याचे समजते. अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुंबईहून आलेल्या त्या व्यक्तीची कोरोना तपासणी करण्यात आली की, नाही? याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. एकीकडे राज्य सराकार कोरोना विषयी गंभीर दखल घेत असले तरी, विविध विभागातील अधिकारी मात्र गंभीर नसल्याचे यावरून दिसून येते. 

loading image
go to top