शेगाव: देशभरातील लाखो भावी भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांचे १४८ व्या प्रगटदिन उत्सवाला येथील श्रींचे मंदिरामध्ये आज ता. २ फेब्रुवारी पासून श्री महारुद्रस्वाहाकार यागाने आरंभ होत आहे..Nagpur News:विदर्भ-मराठवाड्यासाठी हवी रेल्वेची ‘कनेक्टिव्हिटी’; नागपूर-छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वेसेवा नाही, अर्थसंकल्पात अपेक्षा!.उत्सव निमित्ताने श्रींचे मंदिरा मध्ये दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन,सायं. ५.३० ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम दररोज ता.२ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे..सोमवार रोजी ह.भ.प. रामबुवा डोंगरे जाटनांदुर,मंगळवार, ह.भ.प. मनोज बुवा कुलकर्णी,पिंप्राळा बुधवार ह.भ.प. अनिरुध्द बुवा क्षिरसागर सावरगांव मा.शिवर,गुरूवार ह.भ.प. बळीराम बुवा दौंड,शुक्रवार रोजी ह.भ.प. संभाजी बुवा मेहुणकर ,धाराशिव शनिवार रोजी ह.भ.प. मयुर बुवा बोडखे श्री क्षेत्र देहु,रविवार रोजी ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव जालना यांचे रात्री आठ ते दहा किर्तन होईल..तर ता.८ मिती माघ वद्य ७ रविवार ला ह.भ.प. भरत बुवा पाटील, मु. म्हैसवाडी यांचे सकाळी १० ते १२ "शेगांवी श्रींच्या प्रागट्टया" निमित्य कीर्तन होईल.या उत्सवात महारूद्रस्वाहाकारास माघ वद्य १ सोमवारला आरंभ होऊन, माघ वद्य ७ रविवार ता.०८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान होईल. दुपारी उत्सवाची शहरातील प्रमुख दिंडी मार्गाने पालखी परिक्रमा निघेल. तर ता.०९ फेब्रुवारी मिती माघ वद्य ८ सोमवार ला ह.भ.प. रविंद्र बुवा हरणे, मु. श्री क्षेत्र मुक्ताईनगर यांचे सकाळी ७ ते ८ काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे. .Pune News: पुण्यात नवीन शासकीय विश्रामगृह; लष्कर परिसरात ४८ कक्षांची इमारत, ३३ कोटींचा खर्च, ४८ कक्ष उपलब्ध राहणार!.श्रींच्या या प्रकट दिन उत्सवानिमित्त राज्यातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक भक्त श्रींचे दर्शना साठी संतनगरी शेगाव येथे येणार आहेत यासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भजनी दिंड्यांचे सुद्धा आवागमन होणार आहे. एकंदरीत मोठ्या भक्तीमय वातावरणात व उत्साहात हा उत्सव संतनगरी शेगाव येथे श्री संस्थान व भक्त मंडळांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.