Coronavirus| उस्मानाबादेत Remdesivirचा काळाबाजर सुरुच

एका वादग्रस्त हॉस्पिटलचा सामावेश असल्याची चर्चा सध्या सुरु आहे
Remdesivir
RemdesivirRemdesivir

उस्मानाबाद: रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार (black market of remdesivir) अजुनही सूरुच असल्याचे चित्र आहे. शहरातील एका वादग्रस्त दवाखान्यातून त्याची राजरोसपणे चढ्या किंमतीला विक्री (covid 19) होत असल्याची चर्चा आहे. तरीही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार सुरु आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने (Osmanabad district administration) याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी वॉर रुम (war room for covid 19) केली आहे. त्यांच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय इंजेक्शन दिले जाणार नाही असा नियम बनविला आहे. मात्र खाजगी कोवीड सेंटर येथे येणारा पुरवठा योग्य रितीने वितरीत केला जातो का याबद्दल शंका उपस्थित होत आहे. त्यातही एका हॉस्पिटलने त्याचा बाजार केला असून वीस ते पंचवीस हजार रुपयांना एक इंजेक्शन या हॉस्पीटलमधून बाहेर विकले जात असल्याची चर्चा आहे.

Remdesivir
जगण्याच्या इच्छाशक्तीने कोरोनावर वृद्ध दाम्पत्याची मात

अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातीलच मंडळी असा प्रकार करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशा डॉक्टरांच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे. अनेकदा जाहीर सूचना देऊनही त्यांच्या मध्ये कसलाही फरक पडलेला नाही. त्यामुळे त्यांना कायद्याचा वचक बसविणे आवश्यक आहे. लोकांचे मृत्यू होत आहेत.

हॉस्पिटलमध्ये येणारा पुरवठा अशा प्रकारे विक्री करण्याचा अधिकार नाही, तरीही प्रशासनाला न जुमानता हा राजरोसपणे हा प्रकार सुरु आहे. कोणालाही रेमडेसिव्हिर हवे असल्यास शहरातील या हॉस्पिटलमध्ये मोठी किंमत देऊन त्याचा व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनाही हा प्रकार माहीत असला तरी त्यांनीही तक्रार आल्याशिवाय काहीच करता येणार नाही असे म्हणून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. नागरीक सध्या आपल्या कुटुंबातील रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशावेळी त्यांच्याकडून तक्रारीची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.

Remdesivir
ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देत भाजपचे औरंगाबादेत निषेध आंदोलन

प्रशासनाचा पुढाकर आवश्यक

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हॉस्पिटलचे पहिल्यापासून बळ वाढत आहे. अनेकदा कारवाई होऊनही त्यांच्यामध्ये कसलाही फरक पडलेला नाही. सामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक चढ्या अशा लोकांच्या तक्रारी करण्यासाठी पुढाकार घेऊन धोका स्विकारणार नाहीत याची जाणीव या हॉस्पीटलला आहे. तेव्हा प्रशासनाकडूनच एक पाऊल पुढे येऊन या हॉस्पिटलचे ऑडीट करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com