

Doctor Found Dead Inside Car in Latur; Authorities Investigating Cause of Death
sakal
लातूर: येथील 'एमजे हॉस्पिटल'चे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४३) यांनी बुधवारी (ता. १५) आत्महत्या केली. येथील अंबाजोगाई मार्गावर घरापासून चार किलोमीटरवर कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. कारमध्ये भुलीचे औषध, इतर काही औषधांच्या बाटल्या, सिरिंज आढळली. त्यामुळे त्यांनी भुलीच्या औषधाची जादा मात्रा घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.