फसवणूकप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा नोंदवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

बीड -  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पूस (ता. अंबाजोगाई) येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. कारखान्यात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून जमीन घेतली; पण मुलाला नोकरी लावली नाही आणि व्यवहारात ठरल्याप्रमाणे पैसेही दिले नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

उद्धव कचरू सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यावर माणिक भालेराव, वसंत पवार, उद्धव सावंत, संजय सावंत, शांताबाई सावंत, सुमनबाई भालेराव, लखन भालेराव, मौला शेख, जनबनबी शेख आदींच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसे आहेत. उपोषणात चार महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. 

धनंजय मुंडे यांनी पूस शिवारात जगमित्र शुगर हा साखर कारखाना प्रस्तावित केला होता. त्यासाठी मुंडे यांनी जमीन घेतली. मात्र, नोकरी आणि व्यवहारानुसार ठरलेले पैसेही दिले नसल्याचा आरोप पूस येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी बर्दापूर पोलिसांनी टाळाटाळ केली असून, मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report an FIR against Dhananjay Munde for cheating