हिंगोलीत कोरोना संशयित आठ जणांचे अहवाल प्रलंबित

korona
korona

हिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून आठ रुग्णांचे तपासणी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी बुधवारी (ता. आठ) दिली.

हिंगोली येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयितासाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डात एकूण दहा रुग्ण भरती आहेत. यात (४८) वर्षीय कोरोना संशयिताचा अहवाल गुरुवारी (ता. दोन) औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून पॉझिटिव्ह आला आहे. 

दहा संशयितावर उपचार

त्‍याची प्रकृती स्‍थीर असून कुठल्याही प्रकाराची गंभीर लक्षणे नाहीत. तसेच (वय २९) हा संशयित कोरोना रुग्णाच्या निकटतम सहवासातील व्यक्‍ती आहे. त्‍याची प्रकृती स्‍थीर आहे. कुणाल्याही गंभीर प्रकारची लक्षणे नाहीत. या व्यक्‍तीचा अहवाल औरंगाबाद येथून निगेटिव्ह आला आहे. येथे आलेल्या दहा पैकी आठ व्यक्‍ती हिंगोली जिल्‍ह्यातील असून त्‍यांच्या घरातील (वय १९) वर्षीय मुलीचा श्वास घेण्यास तीवृ त्रास होत असल्याने मृत्‍यू झाला आहे. 

सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थिर

त्‍यानुषंगाने घरातील सर्व व्यक्‍तींना आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्‍थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. या सर्वाचे स्‍वॅब अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे तपासणीस पाठविला आहे. त्‍यांचा अहवाल येणे प्रलंबित आहे.

घरातच थांबण्याचा सल्‍ला

दरम्यान, परदेशातून आलेल्या व घरातच अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व ११ व्यक्‍तींचा १४ दिवसांचा होम क्‍वॉरंटाइनचा कलावधी संपला आहे. तरी दक्षता म्‍हणून सर्व व्यक्‍तींना पुढील दोन आठवडे घरातच थांबण्याचा सल्‍ला देण्यात आलेला आहे. येथील आयसोलेशन वार्डात २८ संशयितांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या एक आहे.

आठ संशयितांचा अहवाल प्रलंबित

 तर १९ संशयितांचा अहवान निगेटिव्ह आला असून डिस्चार्ज केलेल्या एकूण रुग्णांची संख्या १९ आहे. शासकीय क्‍वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण व्यक्‍तीची संख्या दहा असून आठ संशयितांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.


पालिका कर्मचाऱ्यास मारहाण


हिंगोली : नगरपालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मस्तानशहा नगरात निर्जंतुकीकरण करताना काही जणांनी पालिकेच्या ट्रॅक्टरचालकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. सात) रात्री अकराच्या सुमारास सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मस्तानशहा नगरमध्ये निर्जंतुकीकरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नगरपालिकेतर्फे साफसफाई तसेच निर्जंतुकीकरणाची कामे केली जात आहेत. यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. मंगळवारी (ता. सात) शहरातील मस्तानशहा नगरमध्ये निर्जंतुकीकरण सुरू होते. या वेळी काही जणांनी ट्रॅक्टर अडवून निर्जंतुकीकरणचा पाईप हातात घेत निर्जंतुकीकरण औषध पिण्याचा प्रयत्न केला. केवळ पाणीच फवारत असल्याचे ओरडत गोंधळ करत ट्रॅक्टरचालकाला मारहाण केली.

आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी

 याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाच्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील काही आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, सर्वच आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यानी लावून धरत कामबंद आंदोलन केले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने बुधवारी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून एका फरार आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले असल्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन केनेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com