औरंगाबादेत रिपब्लिकन सेनेने केले मनूस्मृतीचे दहन

योगेश पायघन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : परंपरेच्या नावाखाली रावण दहन करून मनुस्मृतीतील अस्पृश्यता पाळली जाते. असा आरोप करत आदिवासींच्या नायकाचे मनुवाद्यांनी विद्रुपीकरणाचा विरोध दर्शवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेट समोर गुरुवारी दुपारी मनूच्या पुतळ्याचे  दहन रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने धमचक्र प्रवर्तनदिनी विद्यापीठ परिसरात मनूच्या पुतळ्याचे दहन करून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याच्या मनुवादी प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्यात आला. रावणाविषयी हिंदू ग्रंथामध्येच महाज्ञानी, महाप्रतापी, महाबलशाली, प्रकांड पंडित, महा शिवभक्त चारहि वेदांचे अभ्यासक, शिव ताण्डव स्त्रोताचे रचनाकार लंकेश असे गौरव उद्गार असतांना केवळ परंपरेच्या नावाखाली या देशातील कोट्यावधी आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रावणाचे दहन करण्याची विषमतावादी प्रथा पडण्यात आली. वर्षानुवर्षे रावणाचे विकृतीकरण करून आदिवासी बांधवांना धार्मिक अंधश्रद्धेत गुंतवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी दादाराव राऊत, सचिन निकम, रुपचंद गाडेकर, चंद्रकांत रूपेकर, अॅड अतुल कांबळे, अविनाश जगधने, गुरु कांबळे पँथर विद्यार्थी आघाडीचे गुनरत्न सोनवणे महेंद्र तांबे आदी उपस्थित होती.
 
Web Title: Republican sena burn manusmruti in Aurangabad