आगामी भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ होणार 

राजेभाऊ मोगल 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

शासनाकडून आदेश मिळताच मराठवाड्यातील बिंदू नामावली ठरविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कामही सुरू केले आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रात मेगा भरती करण्याचे घोषित केलेले आहे. त्यादृष्टीने हालचालीसुद्धा सुरू केल्या असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक विभागांत भरती प्रक्रिया झाली नसल्याने बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीत राज्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील जागा भरण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

औरंगाबाद : मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) घोषित करीत 16 टक्के आरक्षण दिले. राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, जात प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येत आहेत.

आगामी शासकीय, निमशासकीय नोकरीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याने त्यासाठी आवश्‍यक ती बिंदू नामावली तयार करण्याचे निर्देश शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. 

शासनाकडून आदेश मिळताच मराठवाड्यातील बिंदू नामावली ठरविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कामही सुरू केले आहे. राज्य शासनाने महाराष्ट्रात मेगा भरती करण्याचे घोषित केलेले आहे. त्यादृष्टीने हालचालीसुद्धा सुरू केल्या असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक विभागांत भरती प्रक्रिया झाली नसल्याने बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीत राज्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील जागा भरण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण दिले असून, आगामी भरतीत त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही सरकार सांगत आहे. त्यानुषंगाने राज्यातील विभागनिहाय सर्वच कार्यालयाची बिंदू नामावली करण्याचे निर्देश शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यात आरक्षणाचा टक्का ठरवत बिंदू नामावली निश्‍चित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकरांनी सर्व विभागांना दिले आहेत. यासाठी शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, संबंधित माहिती प्राप्त होताच ती शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले.

Web Title: reservation for Maratha caste in jobs