दहावी परीक्षेत राज्यात औरंगाबाद विभागाचा निकाल घसरला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच आघाडी घेत आपणच मुलांपेक्षा हुश्शार असल्याचे सिध्द केले आहे. बेस्ट आॅफ फाईव्ह निकषावर लावण्यात आलेल्या निकालात औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल निकाल मागील ५ वर्षाच्या तुलनेत घसरला असून विभागाचा निकाल ७५.२० टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालात ८८.३८ टक्के घेऊन बाजी मारली आहे. ९ विभागीय मंडळात औरंगाबाद विभाग  सहाव्या स्थानी राहिला आणि आहे. 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) प्रात्यक्षिक परीक्षा ११ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान तर १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आल्या. शनिवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. 

 औरंगाबाद विभागाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत निकाल घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकाल १३.६१ टक्क्यांनी कमी लागला आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ८८.८१ टक्के इतका लागला होता. 

तर औरंगाबाद विभागामध्ये १ लाख ८६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८३ हजार २२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते. यातील १ लाख ३७ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ७५.२० टक्के इतकी आहे. औरंगाबाद विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये विभागात बीड जिल्ह्याने ८१.२३ टक्केने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल हिंगोली जिल्ह्याचा ६४. ५३ टक्के लागला आहे. तर अन्य जिल्ह्यात औरंगाबाद ७७. २९ टक्के, परभणी ६६. ३५ टक्के, जालना ७६. १४ टक्के निकाल लागला आहे. यंदा ७१. ७५ टक्के मुले तर ८४.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी त्याच हुशार असल्याचे निकालाद्वारे सिध्द केले आहे. तर बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे अनेक विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाल्याने शतकवीर होण्याचा बहूमान त्यांना मिळाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: results of SSC decrease in Aurangabad