esakal | तब्येत कशी आहे, असे आपुलकीने विचारत राज्यमंत्री सत्तारांनी शेतकऱ्याला दोन हजार रूपयांची नोट भेट दिली
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue Minister For State Abdul Sattar

मदनसुरी (ता.निलंगा) येथील शेतकरी शिवराम माने यांची तब्येत कशी आहे व मुले सांभाळ करतात का? हे प्रश्न विचारून माझ्याकडून हे दोन हजार तुम्हाला राहू द्या. संकट काळात वापरा म्हणून त्यावर सही करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मायेने भेट दिली.

तब्येत कशी आहे, असे आपुलकीने विचारत राज्यमंत्री सत्तारांनी शेतकऱ्याला दोन हजार रूपयांची नोट भेट दिली

sakal_logo
By
सिद्धनाथ माने

मदनसुरी (जि.लातूर) : मदनसुरी (ता.निलंगा) येथील शेतकरी शिवराम माने यांची तब्येत कशी आहे व मुले सांभाळ करतात का? हे प्रश्न विचारून माझ्याकडून हे दोन हजार तुम्हाला राहू द्या. संकट काळात वापरा म्हणून त्यावर सही करून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मायेने भेट दिली. अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे लवकर करा. अनेक ओढ्यावरील पूल वाहून गेले आहेत. रस्ते खराब झाले आहेत. त्याचा अहवाल ही आजच्या आज मला सादर करा, अशा सूचना महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी मदनसुरी येथे प्रशासनाला दिल्या.

पाया ढासळत असेल तर आत्मपरीक्षण करण्याची गरज, मुख्यमंत्री ठाकरेंचा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजपला टोला

मदनसुरी, लिंबाळा, एकोजी मुदगड (ता.निलंगा) येथे बुधवारी (ता.२१) श्री.सत्तार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी आले होते. रामतीर्थ येथील राजकुमार सुरवसे या ग्रामस्थाने मदनसुरी ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे डिलिव्हरी पेशंटला देखील दवाखान्यात घेऊन जाता येत नाही, असे मंत्री महोदयांना सांगितले. हणमंत वाडी येथील शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळ्याचे बिले नऊ महिने होऊन गेले तरी बिले मिळाली नसल्याचे तक्रारी केल्या. श्री.सत्तार यांनी सगळ्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वांना धीर देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. ज्या काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

त्याबाबत ताबडतोब मला आजच्या आज अहवाल पाठवा. शेतकरी अडचणी आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणी रागाने ही बोललं तरी कोणत्याही अधिकाऱ्यांनी मनावर घेऊ नका. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांना धीर देऊन नुकसानाबाबत कळवा अशा सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील अभियंता यांना श्री.सत्तार यांनी किती रस्ते पूल वाहून गेले आहे असे विचारले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये एकनाथ खडसे यांचे स्वागत

त्यावेळी श्री पाटील यांनी नदी हत्तरगा ते कोकळगाव, रामतीर्थ ते मदनसुरी, कासार सिरशी ते निलंगा हा रस्ता व मदनसुरी ओढ्यावरील पूल खराब झाल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, शिवसेनेचे शिवाजी माने, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस.कदम, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, सहायक मंडळ अधिकारी गोरख खुरदे, मंडळ कृषी अधिकारी अनिल शेळके, तलाठी बापा कुलकर्णी यांच्यासह परिसरात अनेक शेतकरी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर