सोन्याची चैन हिसकावणारा रिक्षाचालक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : चाकूचा धाक दाखवत सोन्याची चेन हिसकाविल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रिक्षाचालकाला सोमवारी (ता.30) रात्री अटक केली. त्याला गुरुवारपर्यंत (ता.तीन) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी मंगळवारी (ता. एक) दिले. शेख मोहसीन ऊर्फ लल्ला शेख आरिफ बागवान (रा. जवाहर कॉलनी) असे त्याचे नाव आहे. 
प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी आरोपी शेख रफिक ऊर्फ सोनू याला 28 सप्टेंबर रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्यालाही गुरुवारपर्यंत (ता.तीन) पोलिस कोठडी सुनावली आहे.

सचिन गायकवाड (रा. जयभवानीनगर) हा 14 सप्टेबर रोजी मित्रांसोबत जयभवानी चौकातून गजानन मंदिर रस्त्यावरील एटीएमकडे जात होते. त्यावेळी अचानक दोघेजण आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने लुटणाऱ्याने चाकू काढून वार केला, सचिन जोरात ओरडल्याने त्याचा मित्र धावत आला. तोपर्यंत आरोपींनी सचिनच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेख मोहसीनला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वरील आदेश दिला. प्रकरणात सहायक सरकारी वकील जरीना दुर्राणी यांनी काम पाहिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw driver accused for snatching gold chain