रिद्धी-सिद्धीने उमटविली चार पदकांवर मोहोर 

रिद्धी-सिद्धी
रिद्धी-सिद्धी

औरंगाबाद - 53 व्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वरिष्ठ गटात मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. कनिष्ठ गटात मुलांचा संघ उपविजेता ठरला. औरंगाबादच्या रिद्धी-सिद्धी हत्तेकर या भगिनींनी पुन्हा चार पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

 
प्राधिकरणाच्या मुलींच्या अजिंक्‍यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी चमकदार कामगिरी करीत दोन रौप्य व दोन ब्रॉंझपदके मिळविली. 53 वी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा 26 ते 27 जानेवारीदरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे झाली. या स्पर्धेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद येथील साईच्या केंद्रातील खेळाडूंनी पदके मिळवीत अजिंक्‍यपद पटकावले. औरंगाबाद संघात वरिष्ठ गटात अजय पगारे, शुभम तांबे, करण खरातमोळ तर कनिष्ठ गटात व्यंकटेश अलकुंटे, तसेच मुलींच्या कनिष्ठ गटात रिद्धी हत्तेकर व सिद्धी हत्तेकर या खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्या या यशाबद्दल साईच्या संचालिका सुस्मिता ज्योत्शी, उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंह राठोड, पिंकी देव, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, प्रशिक्षक तनुजा गाढवे, महाराष्ट्र ऍमॅच्युअर जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, संभाजीनगर जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष ऍड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, आदित्य जोशी, रणजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. 
 
जुळ्या बहिणींची चमकदार कामगिरी 
 
स्पर्धेत रिद्धी, सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी चमकदार कामगिरी केली. कनिष्ठ गटात मुलींच्या वैयक्तिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रिद्धीने 41.40 गुण मिळवत कास्यपदक पटकावले. सिद्धीने 40.35 गुण मिळवत चौथे स्थान प्राप्त केले. तसेच रिद्धीने बॅलेन्सिंग बीम या साधन प्रकारात रौप्यपदक पटकावले. सिद्धी हत्तेकर हिने आपल्या कामगिरीत सातत्य राखीत टेबल वॉल्ट या साधन प्रकारात रौप्यपदक तर अनइव्हन बार या प्रकारात ब्रॉंझपदकावर नाव कोरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com