औरंगाबादमध्ये दिवसा रिमझिम; रात्री मध्यम

योगेश पायघन
रविवार, 21 जुलै 2019

औरंगाबाद शहरात शनिवारी (ता.20) दुपारपासून रिमझिम पाऊस पडत होता. रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नागरिक सुखावले. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 

औरंगाबाद - शहरात शनिवारी (ता.20) दुपारपासून रिमझिम पाऊस पडत होता. रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नागरिक सुखावले. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 

शनिवारी दुपारी शहरात सर्वत्र रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या दरम्यान पावसाने काहीशी उसंत घेतली; पण त्यानंतर रात्री दहापासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरवात झाली. अकरानंतर पावसाचा जोर काहीसा वाढला होता. 11.30 ते 12 या अर्धा तासांत बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बारानंतर पुन्हा पावसाचा जोर ओसरला; मात्र रिमझिम सुरू होती. 

जिल्ह्यात असा झाला पाऊस
जिल्ह्यात दिवसभरामध्ये औरंगाबाद तालुक्‍यात 8.80 (153.10), फुलंब्री 32.50 (238.25), पैठण 14.9 (82.46), सिल्लोड 0.88 (214.44), सोयगाव 1.33 (186.67), वैजापूर 7.80 (149.80), गंगापूर 6.56 (127.11), कन्नड 6.13 (137.50) आणि खुलताबाद तालुक्‍यात 18.00 (120.00) तर जिल्ह्यात एकूण 156.59 मि.मी. पावसाची नोंद झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rim jhim Rain in Aurangabad