‘दंगल नियंत्रणात आली का?’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - सहायक पोलिस आयुक्‍त गोवर्धन कोळेकर यांनी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून येथील दंगल थांबविण्याचा प्रयत्न केला असता समाजकंटकांच्या दगडफेकीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आल्यावर शुद्धीवर येताच त्यांनी दंगल नियंत्रणात आली का, असा प्रश्‍न विचारला. यामुळे सर्वांनाच त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन झाले.

शहरात शुक्रवारी (ता. ११) दोन गटांत वादावादी झाल्यानंतर दंगल उसळली. बघता बघता शहरातील मध्यवर्ती भागात वाहने, दुकाने पेटवून देण्याचे प्रकार सुरू झाले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी श्री. कोळेकर स्वत: सामोरे गेले. त्याचवेळी त्यांच्या घशावर दगड लागला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी त्यांच्या स्वरयंत्रावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शुद्धीवर आले तरी त्यांना बाेलता येत नव्हते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना डायरी देऊन लिहायला सांगितले. त्यांनी लिहिले, रात्रीची घटना शांत झाली का?  हे वाचून उपस्थित असलेले सर्वजण स्तब्ध झाले. जखमी श्री. परोपकारी यांची तब्येत कशी आहे?, असा प्रश्नही त्यांनी लिहून विचारला. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलला एअर ॲम्ब्युलन्सने हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: riot come under control ask Assistant Commissioner of Police Govardhan Kolekar