रस्त्यावरील कचरा कर्मचाऱ्यांना भोवणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

औरंगाबाद - कचरा कोंडीला पाच महिने पूर्ण झाल्यानंतरही महापालिकेत बैठकांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (ता. 16) महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शहरातील कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करा, घरोघरी जाऊनच कचरा जमा करा, रस्त्यावर कचरा दिसल्यास वॉर्ड अधिकारी ते स्वच्छता कर्मचारी यांना सामूहिक आर्थिक दंड लावण्यात येईल, वेळप्रसंगी निलंबनाची करू, असा इशारा दिला. इंदूर महापालिकेने सुमारे एक हजार बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना दम भरण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सोमवारी कचरा कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाच महिन्यांनंतरही अद्याप रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कायम आहे. याचा अर्थ महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन कचरा उचलण्यात कमी पडत आहेत, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण झालेच पाहिजे, शंभर टक्के घरोघरीच संकलन व्हावे, तसे न झाल्यास ज्या भागात रस्त्यावर कचरा दिसेल तिथे कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

बैठकीतील निर्णय
- मुबलक औषधपुरवठा करावा.
- शहरात औषध फवारणी, पावडर टाकणे
- घाटी प्रशासनाला औषधपुरवठा करणार.

Web Title: road garbage municipal employee fine