'उमरग्यातील रस्ते हेमामालीनीच्या गालासारखे'

अविनाश काळे
Monday, 25 January 2021

खासदार ओमराजे निंबाळकरांनी उमरग्यातील रस्त्याला दिली हेमामालिनीच्या गालाची उपमा दिली आहे

उमरगा (उस्मानाबाद): सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात पाझर तलावाची संख्या मोठी आहे. मात्र नादुरुस्त स्थितीमुळे पाणी क्षमता कमी होत असल्याने तलावाच्या दुरुस्तीसाठी ८२ कोटी खर्चाचा आराखडा करण्यात आला असून पाच कोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. उर्वरीत निधी जिल्हा नियोजन समिती व राज्य सरकारकडून प्राप्त करून तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जातील. असे जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

उमरग्यात नव्याने बांधलेल्या शासकिय विश्रामगृहाच्या इमारतीचे उदघाटन पालकमंत्री श्री. गडाख यांच्या हस्ते सोमवारी (ता. २५) झाले त्यावेळी ते बोलत होते. खासदार ओमप्रकाश निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री. सगर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, बाबूराव शहापूरे, मोहन पणूरे आदीची उपस्थिती होती.

दुर्दैवी! पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

पालकमंत्री श्री. गडाख यांनी आमदार चौगुले यांचा मतदारसंघाच्या विकास कामाच्या धडपडीचे कौतूक केले, ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यांच्या कुटुंबावरील आघात वेदनादायी असतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या शासकिय लाभाची मदत थोडकी असली तरी ती उदरनिर्वाहाचे साधन निर्मितीसाठी मोलाची असते. अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या त्रुटी दूर करून शासनाच्या मदतीसाठी पात्र करणारे जिल्हाधिकारी यांचे कामही कौतूकास्पद आहे. दरम्यान या वेळी तहसीलदार संजय पवार यांनी तालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या पत्नीला प्रत्येकी एक लाखाचा धनादेश देण्यात येत असल्याचे सांगितले. श्री. गडाख यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय विभूते आदी उपस्थित होते.

'मी मंत्रालयात सचिव झाल्यावर लातूरकर मला कधीही येऊन भेटू शकतील'

उमरग्यातील रस्ते हेमामालीनीच्या गाला सारखे !
उमरगा - लोहारा तालुक्याचे आमदार चौगुले यांच्याकडे विकास निधी खेचून आणण्याचे कौशल्य असल्याचे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या भागातील रस्ते चांगले आहेत, जसे हेमामालीनीच्या गालासारखे. गायीला दोन खोंड जन्मले तर एक मरकं असतं, दुसरं दुधचं अधिक पितं. ही त्यांनी केलेली टिप्पणी विकासकामाबाबत होती की, त्यात संदिग्धता होती. याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान या वेळी खासदार निंबाळकरांनी शेत रस्त्याचे कामे व्यापक प्रमाणात होण्याची अपेक्षा केली. उमरग्याच्या सूसज्ज शासकिय विश्रामगृहासारखी इमारत उस्मानाबादला व्हावी, त्यासाठी काय काय करावे लागते याची माहिती आमदार चौगुले तुम्ही द्या असे निंबाळकर म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roads in Umarga Hema malinis cheeks Statement Omraje Nimbalkar