नाष्टा करायला गेले अन् एक लाखाला मुकले...

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नांदेड : शहरातील हॉटेलवर गेलेल्या एका प्राध्यापकाला नाष्टा चांगलाच महागात पडला. त्यांनी बँकेतून काढलेली एक लाख रकमेची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी (ता. 15) दुपारी साडेचारच्या सुमारास हदगाव शहरात घडली. 

हदगाव येथील दत्त कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक गुलाब आनंदराव मोरे यांनी आपल्या बँक खात्यातून एक लाक रुपये काढले. रस्त्यावरून जातांना ते रविकिरण हॉटेलवर काही नाष्टा करण्यासाठी थांबले. हॉटेलच्या गल्ल्यावर एक लाख रुपये असलेली बॅग ठेवली. हॉटेलचालकास ते बोलत असतांना त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने टेबलवर ठेवलेली बॅग लंपास केली.

टेबलवर पहाताच बॅग दिसली नसल्याने त्यांना चांगलाच घाम फुटला. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या काही व्यक्तीना विचारणा केली. मात्र बॅग चोरणारा तोपर्यंत पसार झाला. रात्री उशिरा प्राध्यापक गुलाब मोरे यांच्या फिर्यादीवरुन हदगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मोरे करित आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery of 1 lakhs from hotel in Nanded