बोधडी-हिमायनतनगर रस्त्यावर दरोडा

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 18 जून 2019

नांदेड : चारचाकी गाडीचा काच फोडून चालकाशी वाद घालून मारहाण केली. एवढेच नाही तर अज्ञात सहा जणांनी गाडीतील सव्वा लाख रुपये व एक मोबाईल असा दीड लाखाचा एेवज जबरीने चोरून नेला. ही घटना रविवारी (ता. 16) रात्री साडेआठ वाजता बोधडी ते हिमायनगर रस्त्यावर घडली. 

नांदेड : चारचाकी गाडीचा काच फोडून चालकाशी वाद घालून मारहाण केली. एवढेच नाही तर अज्ञात सहा जणांनी गाडीतील सव्वा लाख रुपये व एक मोबाईल असा दीड लाखाचा एेवज जबरीने चोरून नेला. ही घटना रविवारी (ता. 16) रात्री साडेआठ वाजता बोधडी ते हिमायनगर रस्त्यावर घडली. 

यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी (ता. उमरखेड) येथील अनिल अशोक गडपेवार (वय 28) हा आपल्या एका साथीदारासह किराणा मालाची वसुली करणयासाठी किनवट तालुक्यात आले होते. त्यांच्यासोबत काही किराणा मालही होता. वसुलीचे पैसे घेऊन ते आपल्या आयचरमधून घराकडे निघाले. यावेळई रस्ता लुटमार करणारी टोळी रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसली होती. आयचर गाडी येताच दगड मारून समोरचा काच फोडला. यावेळी चालक अनिल गडपेवार हा खाली उतरून त्याला जाब विचारत असतांना दबा धरुन बसलेले अन्य पाच जण तिथे आले. त्यांनी माराहण करून गाडीतील नगदी सव्वा लाख रुपये एक मोबाईल आणि काही महत्वाचे कागदपत्र लंपास केले. चोरटे पांढऱ्या रंगाच्या कारमधून चार जण तर विनानंबरच्या पल्सर कंपनीच्या दुचाकीवरून ईस्लापूरकडे पसार झाले.

अनिल गडपेवार यांच्या फिर्यादीवरुन किनवट पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 17) अनोळखी चोरट्यांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाकल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. कांबळे हे करीत आहेत. या प्रकरणी विचारणा केली असता श्री. कांबळे म्हणाले की, सध्यातरी आरोपी हाती लागले नाही. त्यांच्या अटकेसाठी पोलिस तैनात केले असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery at Bodhai Himayatnagar road