जालना : पारनेर येथे घरफोडी

बाबासाहेब गोंटे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

अंबड (जालना) : अंबड शहरापासून लगत असलेल्या पारनेर (ता.अंबड) येथील सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घरी रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी फोडले. अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने देखील लंपास केले आहेत. 

सोपान पंढरीनाथ खरे यांच्या घराचे रविवारी (ता. 9) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेले पाच हजार रुपये तसेच दोन सोन्याचे ओम, सोन्याचे मणी मिळून सरासरी पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये असा तीस हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच  घरातील साहित्य असताव्यस्त करून चोरटे लंपास झाले. या घटनेची माहिती अंबड पोलिस ठाण्याला कळताच बीट जमादार र्माच्छद्र वाघ यांनी सोमवारीप (ता.10) दुपारी घटनास्थळी ग्रामासमस्त चोरीच्या घटनेचा प्रत्यक्ष पंचनामा केला.

अंबड शहर व परीसरात घरफोडी, दुकानफोडी, शेतवस्तीवर भुरट्या चोरटयाचा डल्ला मारणे सुरुच आहे. यामुळे नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी वाढत्या चोरीच्या घटनेला आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

Web Title: robbery in home at parner jalana