तिजोरी चोरीचा प्रयत्न फसला!

safe.jpg
safe.jpg

बनोटी : गोंदेगाव (ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) येथील  महाराष्ट्र बॅंक शाखेमधील तिजोरी चोरीचा प्रयत्न मंगळवारी (ता. १६) पहाटे फसल्याने बँकेतील नऊ लाख ४७ हजार रूपये सुरक्षित राहिले आहे. सोयगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहाटे  चोरट्यांनी प्रथम बँकेच्या शटर चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर चोरट्यांनी गुप्त कॅमेर्याचे कनेक्शन तोडण्याच्या प्रयत्नात कनेक्टिव्हिटी कनेक्शनच्या वायरी तोडुन तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात अयशस्वी झाल्याने कनेक्टिव्हिटी डेस्कटॉप घेऊन चोरटे पसार झाले.

दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एटीएम चोरी झाल्याच्या दूसऱ्या दिवशीच येथील बॅंक फोडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साफसफाई कर्मचारी वैभव पाखले नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजता बॅंकेत आले असता बॅक फुटल्याचे त्यांच्या ध्यानात आले. त्यांनी माहीती बॅंकेच्या वरीष्ठांना दिल्यावर शाखा व्यवस्थापक संतोष कुमार, लिपीक विष्णुपंत सोनवणे यांनी शाखेची पाहणी करून सोयगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम मेहत्रे, पोलीस निरीक्षक शेख शकील फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी तिजोरीतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे समजले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com