esakal | पैसा कितीही मोठा असला तरी पैशापेक्षा मोठी गोष्ट लोकांचा पाठिंबा, रोहित पवारांनी साधला तरुणाईशी संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar

रोहित पवार म्हणाले की, ज्या युवकांचे प्रतिनिधीत्व करतो त्या युवांचा पेहराव आहे आणि तोच पेहराव पुढेही राहिल.

पैसा कितीही मोठा असला तरी पैशापेक्षा मोठी गोष्ट लोकांचा पाठिंबा, रोहित पवारांनी साधला तरुणाईशी संवाद

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि.बीड) : तुम्ही राजकारणात कोणता हेतू घेऊन आलात असा प्रश्न विचारताच मी व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम करतो. पण भेदभावाचे राजकारण टाळुन विकासाचे राजकारण व समाजकारण करण्यासाठी राजकारणात आलो आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आजच्या युवा वर्गाने व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचे कर्जत - जामखेड मतदारासंघाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

येथील सोळंके महाविद्यालयात आयोजित संवाद तुरूणाईशी या कार्यक्रमात शनिवारी (ता.१६) ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी आमदार प्रकाश सोळंके होते. यावेळी जिल्हा परिषद सभापती जयसिंह सोळंके, अॅड. बी. आर. डक, प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. श्री.पवार म्हणाले की, ज्या युवकांचे प्रतिनिधीत्व करतो त्या युवांचा पेहराव आहे आणि तोच पेहराव पुढेही राहिल. पैसा कितीही मोठा असला तरी पैशापेक्षा मोठी गोष्ट लोकांचा पाठिंबा व लोकांचे सहकार्य आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

आपला देश संविधानावर चालतो. संविधानाविरोधात बोलणाऱ्या, वागणाऱ्यांना विरोध आहे. संविधानामुळे देश टिकुन आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी पोलिस प्रशासन व राज्याच्या विरोधात बोलणं खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत युवा वर्गाने व्यवसाय किंवा यशस्वी शेती करण्याचा सल्लाही त्यांनी तरुण-तरुणींना दिला. या संवाद कार्यक्रमात आमदार पवारांना अनेक युवक - युवतींनी राजकीय, शैक्षणिक प्रश्न विचारले. प्रास्ताविक आमदार प्रकाश सोळंके यांनी तर आभार जयसिंह सोळंके यांनी मानले.

संपादन - गणेश पिटेकर