जन्मलेलं बाळ बोललं की जागे रहा... अन रात्रभर लोकं जागेच

जलील पठाण
गुरुवार, 26 मार्च 2020

भीत भीत अनेकांनी फोन उचलला आणि समोरचा काळजीने सांगू लागला की औशात नुकतेच एक बाळ जन्मले आहे आणि ते चक्क मोठ्या माणसासारखं बोललं की, आजची रात्र धोक्याची आहे आणि कुणीही झोपू नका, जो झोपला तो संपला' ही बातमी कोणी सांगितली याच्या खोलात न जाता जो तो घाबरलेल्या आणि  काळजीने आपापल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन करू लागला आणि जागे राहण्यास सांगू लागला. 

औसा : औसा तालुक्यात नुकतेच एक बाळ जन्मले असून हे बाळ चक्क बोलले आणि म्हणाले, की आजची रात्र धोक्याची आहे आणि जागे राहा... झाले ज्याला ही बातमी समजली तो मध्यरात्री झोपेत असलेल्या आपल्या नातेवाईकांना सावध करू लागला... 

हा हा म्हणता एक एका माणसाला दहा नातेवाईकांचे फोन येऊ लागले आणि डोळ्यातली झोप उडून गेली. हे चित्र होते (बुधवारच्या रात्री) औसा तालुक्यासह जिल्ह्यातील कांही गावामध्ये. आधीच कोरोनाची भीती कमी होती की काय त्यात भर या अफवेची पडली आणि अनेक गावातील लोकांनी रात्र जागून काढली.

भारतात अफवांना कधी आणि कोणत्या गोष्टींचे पाय फुटतील, याचा कांही नेम नाही. बुधवार (ता. २५) च्या मध्यरात्री (दोन वाजण्याच्या सुमारास) घराघरातील मोबाईल अचानक वाजू लागले, एवढ्या रात्री नातेवाईकांचा फोन का आला म्हणून अगोदर काळजात धस्स झालं.. 

भीत भीत अनेकांनी फोन उचलला आणि समोरचा काळजीने सांगू लागला की औशात नुकतेच एक बाळ जन्मले आहे आणि ते चक्क मोठ्या माणसासारखं बोललं की, आजची रात्र धोक्याची आहे आणि कुणीही झोपू नका, जो झोपला तो संपला' ही बातमी कोणी सांगितली याच्या खोलात न जाता जो तो घाबरलेल्या आणि  काळजीने आपापल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन करू लागला आणि जागे राहण्यास सांगू लागला. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

अफवेवर विश्वास ठेवून फोन करणारे हितचिंतक एवढे वाढले, की अनेकांना एकाचा फोन ठेवला की दुसऱ्याचा येत होता आणि प्रत्येक वेळा सांगणारा चार गोष्टी आपल्या मनाचे लावून सांगत होता पण सर्वांचा रोख जमलेल्या बळाने आजची रात्र धोक्याची सांगितलेली असल्याकडे होता. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात याचा प्रभाव जास्त दिसून आला कारण कुटुंबच्या कुटुंब रात्रभर जागत राहिले.

कधी जमलेले बाळ बोलते, तर कधी बहीण भावाला भेटण्याने भाऊ बहिनाचा धोका टळणार, तर कधी बहिणी बहिणी भेटणं गरजेचे असल्याच्या अफवा उठतात आणि मग याचा शोध न लावता जनता तीच अफवा आणखीन तिखट मीठ घालून पुढे फॉरवर्ड करण्याचे सौहार्द पार पाडत असल्याने अधून मधून असल्या अफवेने दोन चार दिवस जनजीवन ढवळून निघते.

अशा अफवा पसरवून लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण केली जाते. कुणीतरी खोडसाळपने हा प्रकार केलेला असतो. जेव्हा आपण आशा अफवांच्या खोलात जाऊन शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला बुडच नसते. त्यामुळे लोकांनी आशा अफवाना बळी पडू नये. बाळ बोलण्याची प्रक्रिया बाळ वर्षाचे होईल तेव्हा सुरू होते.
- सचिन मिटकरी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, औसा तालुकाध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roumors In Latur About Coronavirus Pune Maharashtra News