टाकळी येथे जमावाला शांत करण्यासाठी राऊंड फायर

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जुलै 2018

टाकळी कुंभकर्ण येथे जमावाला शांत करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या पथकाने शनिवारी (ता.28) हवेत दोन राऊंड फायर केले.
 

परभणी-  टाकळी कुंभकर्ण येथे जमावाला शांत करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या पथकाने शनिवारी (ता.28) हवेत दोन राऊंड फायर केले.

टाकळी कुंभकर्ण येथे ग्रामीण पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाटी राज्य राखीव पोलिस बलाची एक तुकडी टाकळी कुंभकर्ण येथे गेली होती. परंतू, तेथील जमावाने या गाडीला घेरण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला जमावाला शांत कऱण्यासाठी एसआरपीएफचे जवान खाली उतरले. परंतू, जमावा अंगावर चालून आल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत दोन राऊंड फायर केले अशी माहिती पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी दिली.

Web Title: Round fire to Calm down the crowd at Takli

टॅग्स