आरपीएफच्या जवानांनी वाचविले एकाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

दैव बलवत्तर व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची व अधिकाऱ्यांची तत्परता यामुळे धावत्या रेल्वेतून खाली पडलेल्या एका वृध्द प्रवाशाला त्यांनी सावरले. संकट समयी वर्दीतले ते भारत मातेचे पुत्र यामुळे मला जीवदान मिळाल्याची भावना रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली.
 

नांदेड- दैव बलवत्तर व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची व अधिकाऱ्यांची तत्परता यामुळे धावत्या रेल्वेतून खाली पडलेल्या एका वृध्द प्रवाशाला त्यांनी सावरले. संकट समयी वर्दीतले ते भारत मातेचे पुत्र यामुळे मला जीवदान मिळाल्याची भावना रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली.

नांदेड येथून परभणी येथे जाण्यासाठी सप्तगिरी कॉलनी नांदेड येथील देवराव तुकाराम मोरे (वय 65) हे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. 27) सकाळी दहा वाजता ते हजूर साहीब नांदेड स्थानकावरील फलाट क्रमांक चारवर  आले. तपोवन एक्सप्रेस (क्र. 17618) मध्ये बसण्यासाठी निघाले परंतु थोडा उशीर झाल्याने गाडी सुटली. धावत्या गाडीमध्ये चढत असतांना वयोवृध्द असलेल्या लोणे यांचा तोल सुटला आणि ते रेल्वेच्या एका दांड्याला धरुन जवळपास 20 फुट फरफटत गेले. मात्र, रेल्वेखाली येण्यापूर्वीच तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक नविन प्रताप सिंह व सहकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी  क्षणाचांही विलंब न करता वर्दीतल्या या देवदुतांनी प्रसंगावधान दाखवून मदतीचा हात देऊन मोरे यांना वाचविले.

या वृध्द प्रवाशांला पोलिसांनी धीर देत पोलिस ठाण्यात आणले. यानंतर मोरे यांनी आपले जीव वाचविणाऱ्या सर्व जवानांचे अभिनंदन केले. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी, पोलिस उपनिरीक्षक संतोष कुमार, जवान संतोष इंगोले, एस. श्रीधर, हमीद खान आणि नवदीप यांची उपस्थिती होती. रेल्वे सुरक्षा आयुक्त श्री. पांडे यांनी या सर्व टीमचे कौतूक केले.

Web Title: RPF jawan saved one person life