रेल्वेत विसरलेली दागिन्यांची बॅग 'आरपीएफ'ने केली परत

nanded
nanded

नांदेड : प्रेमसिंग चव्हाण, सिनियर प्रोफेसर यशवंत महाविद्यालय हे मुंबई-नागपुर नंदीग्राम एक्सप्रेसने  बी-1 /25 या  बर्थवर नांदेड ते किनवट असा प्रवास करत होते. त्यांना सहा लाख रुपये किमतीचे दागिने असलेली एक पांढरी बॅग सापडली.  सोन्याचे दागिने होते त्यांनी ही  बेग किनवट रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर आणि आरपीएफ यांना सुपूर्द केले. 

रेल्वे पोलीसांनी समीर राठोड, मुंबई यांचा शोध लावुन ही सहा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पांढरी बॅग रेल्वे पोलिसांनी त्यांना सुपूर्त केली. ही प्रेमसिंग चव्हाण नांदेड यांनी दाखवलेल्या ईमानदारीमुळे आणि नैतिकतेमुळेच राठोड यांना दागिने परत मिळाले. त्यांच्या या कार्याबद्दल त्रिकालज्ञ राभा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक ,नांदेड, विश्वनाथ ईरया, अप्पर रेल्वे व्यवस्थापक नांदेड आणि इतर रेल्वे अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या कार्याची खूप प्रशंसा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com