रिपाईची अत्याचार पिडीतांना पन्नास हजारांची मदत

योगेश पायघन
शनिवार, 16 जून 2018

मुले पोहायला गेली म्हणुन अमानुष मारहाण करणे, ही राज्याच्या प्रतिमेला काळीमा लावणारी घटना आहे. त्यामुळे जामनेर तालुक्‍यातील वाकडी गावच्या त्या पीडीत मुलांची व कुटुंबीयांची भेट घेतली. हा सवर्ण दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावुन सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असला तरी गुन्हेगार आहे. त्यांना योग्य शासन होईल असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपची सत्ता आहे म्हणुन या घटनेचे राजकारण करु नका, असेही ते म्हणाले.

औरंगाबाद- मुले पोहायला गेली म्हणुन अमानुष मारहाण करणे, ही राज्याच्या प्रतिमेला काळीमा लावणारी घटना आहे. त्यामुळे जामनेर तालुक्‍यातील वाकडी गावच्या त्या पीडीत मुलांची व कुटुंबीयांची भेट घेतली. हा सवर्ण दलितांचा वाद नाही. त्या मुलांच्या पालकांना समजावुन सांगता आले असते. या घटनेत गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असला तरी गुन्हेगार आहे. त्यांना योग्य शासन होईल असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपची सत्ता आहे म्हणुन या घटनेचे राजकारण करु नका, असेही ते म्हणाले. 

शनिवारी जामनेर तालुक्‍यातील वाकडी येथील पिडीत दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन आल्यावर सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले. या घटनेत दोशी चौघांवर ऍट्रॉसीटी ऍक्‍ट लावण्यात आला असुन दोन जन पोलीसांच्या ताब्यात असुन दोन जण फरार आहेत. सामाजीक न्याय खात्याने पिडीतास एक लाखाची मदत केली असुन, आरपीआयच्या वतीनेही प्रत्येकी पंचविस हजारांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री विदेश दौऱ्याहुन परतल्यावर मुख्यमंत्री निधीतुन मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. पिडीत मुलाच्या आईने भिती व्यक्त केल्याने पोलीस अधिकाऱ्यांना त्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. गावकऱ्यांनी या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले. मातंग समाजाच्या दोन्ही कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन व एकनाथ खडसे यांनाही या प्रकरणात लक्ष देण्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे देशात नाचक्की झाली आहे. दलितांवर अत्याचार होत आहेत. अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्या व्हायला नको. पण भाजपचे सरकार असल्याने या घटना होत आहेत. असे म्हणणे चुकीचे आहे. अशा घटना घडु नये यासाठी गावकऱ्यांनीही प्रयत्न करायला पाहीजे. असेही ते म्हणाले. असेही आठवले यावेळी म्हणाले. 

Web Title: RPI helps fifty thousand rs for victim