'आरटीई'चे प्रवेश आता नवीन नियमानुसार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद - आरटीईअंतर्गत (राइट टू एज्युकेशन) 25 टक्‍के जागांवर वंचित गटातून यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती व दिव्यांग बालकांनाच प्रवेश दिला जात होता. आता न्यायालयाच्या आदेशानुसार या गटातून व्हीजेएनटीच्या चारही संवर्गांसह ओबीसी, ईबीसी आणि एचआयव्हीबाधित व प्रभावित बालकांनाही 25 टक्‍के जागांवरील मोफत प्रवेशाचा लाभ मिळणार आहे.

परिणामी, आता जिल्ह्यात चार हजार 229 जागांवर नवीन नियमानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे मोफत प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आठ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले. पहिली व दुसरी फेरी पूर्ण झालेल्या ठिकाणी नवीन कार्यपद्धतीनुसार सोमवारपासून (ता. 21) गुरुवारपर्यंत (ता. 31) प्रवेशेच्छुकांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

Web Title: RTE admission new rule