निवडणूकीच्या कामासाठी नकार, कळंबमध्ये आरटीओची खासगी वाहनधारकांचा दमदाटी!

दिलीप गंभीरे
Sunday, 29 November 2020

निवडणूकीच्या कामासाठी लागणारे वाहने देण्यास गाडी मालकांनी नकार दर्शविला तर आरटीओ अधिकाऱ्यांनी चक्क दिला दम, जर वाहने रस्त्यावर दिली तर याद राखा असे म्हटल्यावर  वाहन मालकांना आपली वाहने द्यावीच लागली. अधिकाऱ्यांच्या या वृत्तीचा कऴंबमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. 

कळंब (उस्मानाबाद) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली आहे. तालुक्यात १० मतदान केंद्र आहेत. निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रणेला वेळेत पैसे मिळत नसल्याने निवडणुकीच्या कामासाठी खासगी वाहने कोण निवडणूक विभागाला देत नाहीत. त्यामुळे स्वतः उपप्रादेशिक कार्यलयातील अधिकाऱ्यांनी गाड्या उपलब्ध करून देण्याचे जुगाड लावले आहे. निवडणुकीच्या कामासाठी वाहने द्या, नसता तुमची गाडी रस्त्यावर दिसली की आत टाकीन आशा धमक्या देऊन गाड्या उपलब्ध करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप असा सामना रंगला आहे. एक डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून अवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण व भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. कऴंब तालूक्यात दहा मतदान केंद्र असून मतदान यंत्र, निवडणूक अधिकारी, निवडणूक प्रक्रिया पार पाडणारी यंत्रणा याना मतदान केंद्रावर येण्या-जाण्यासाठी वाहने आवश्यक आहे. निवडणूक विभागाने कळंब तालुक्यातील मतदान केंद्रासाठी किती वाहने लागतील किराया किती घेतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी घेऊन वाहने पाचारण करण्याची तयारी केली होती. मात्र मागच्या काही निवडणुकीचे वाहन मालकांच्या गाड्या घेण्यात आल्या होत्या त्याचे मानधन मिळाले नसल्याने निवडणूकीच्या कामासाठी वाहन किरायाने नको रे बाबा असा पवित्रा वाहनं मालकांनी घेतल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरटीओ ने वाहने उपलब्ध करून देण्याचे लावले जुगाड

मागील निवडणूकीला शहर तालुक्यातील वाहने निवडणूक विभागाने किरायाने घेतली होती. आठ ते दहा महिन्यांनी निवडणूक विभागाने भाडे रक्कम दिली. किराया मिळविण्यासाठी वाहन मालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला तर वाहने देयाचीच नाही असा पवित्रा वाहन मालकाचा असल्याने शनिवार (ता.२८) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी तळ ठोकून होते. वाहने देता का नाही, जर वाहने रस्त्यावर दिसले. तर आत टाकीन असा दम देऊन निवडणुकीच्या कामाला वाहने उपलब्ध करून घेण्याचे जुगाड लावण्यात आले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO cracks down on vehicle owners Kalamb Incidents