शंभर रुपयांच्या ‘अर्थ’साठी ऑनलाइन पावत्यांना फाटा!

Traffic Police
Traffic Police

औरंगाबाद - एकीकडे ऑनलाइन कारभाराला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाइन पावत्यांऐवजी चक्क शंभर रुपयांची मागणी काही वाहतूक पोलिसांकडून होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त झाल्या. याला वेळीच आवर घालण्याची गरज वाहनधारक, नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जळगाव रस्त्यावरील सिडको एन- वन टाऊन सेंटरजवळ नियमनावेळी रविवारी (ता. पाच) पावणेबाराच्या सुमारास एका विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याने त्याची चूक कबूल करून ऑनलाइन पावती देण्याची मागणी केली होती; परंतु पोलिसांकडून चक्क ऑनलाइन बंद झाल्याचे सांगून ऑफलाइन दंड भरण्यास सांगण्यात आले. यातून निष्कारण पोलिसांकडून वाद घालण्यात आल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्याच दिवशी काही वेळापूर्वी एका व्यक्तीला हेल्मेट नसल्याने चक्क शंभर रुपये मागण्यात आले. ऑनलाइन पावत्या देण्याऐवजी शंभर रुपयांचे ‘अर्थ’कारण काही वाहतूक पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.  
दुचाकीस्वारांनाच टार्गेट केले जाते. सामान्यांची पिळवणूक होत आहे. हेल्मेटच्या नावाखाली सापडला की धर हे पैसे कमाविण्याचे साधन झाले असून, विशिष्ट वस्त्या, परिसरांतच कारवाई केली जात आहे. 

प्रशिक्षणाची गरज
दर्जेदार नियमनासाठी शहरातील वाहतूक पोलिसांकडे मोठी क्षमता आहे; परंतु नियमनापेक्षा दंडावर अधिक भर दिला जातो. त्यात नागरिकांशी वाद होतात. दमदाटी व अरेरावीच्या प्रकाराने नागरिकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा कलुषित होते. नागरिक-पोलिसांत समन्वय व आदर राहावा, यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेतच; परंतु वाहतूक पोलिसांनाही परिस्थिती हाताळण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com