घनकचऱ्याचे नियम पायदळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

औरंगाबाद - रस्त्यांवर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे भलीमोठी नियमावली असली तरी कारवाई करण्यासाठी यंत्रणाच नसल्याने घनकचऱ्यासंबंधीचे नियम दररोज पायदळी तुडविले जात आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या कचराकोंडीतही महापालिकेने केवळ इशारे देण्याचे काम केले हे विशेष. 

शहरातील कचऱ्याच्या कोंडीला ५८ दिवस पूर्ण झाले असले, तरी महापालिकेला अद्याप तोडगा सापडलेला नाही. सध्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पीट घेण्याचे काम सुरू आहे. तर सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे मशीन केव्हा येतात, याची प्रतीक्षा केली जात आहे.

 दरम्यानच्या काळात, सुक्‍या कचऱ्याचा साठा सुमारे दोन हजार टनांपर्यंत पोचला आहे. कचराकोंडी सुरू झाल्यापासून महापालिकेने ओला-सुका कचरा वेगवेगळा न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, शंभर टनपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्ससह इतरांनी स्वतः कचऱ्यावर प्रक्रिया करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, कचऱ्याला आगी लावणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे इशारे दिले. मात्र, बोटावर मोजण्याएवढ्या कारवायाच झाल्या. प्रत्यक्षात आजही ३० टक्के ओला-सुका रस्त्यावर फेकला जात आहे. 

दोन दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्तांनी देखील कचरा एकत्र देणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनासंबंधी घालून दिलेल्या नियमावलीची आठवण झाली असून, त्याचे पालन करण्यात यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहरवासीयांना देण्यात आला आहे. 

असे आहेत नियम... 
 रस्त्यावर थुंकणे  - २५ रुपये
 कचरा रस्त्यावर टाकणे -  ५० रुपये
 फेरीवाले, टपरीवाल्यांनी घाण टाकल्यास -  १०० रुपये
 भाजीवाले, मासळी विक्रेत्यांनी घाण टाकल्यास -  १५० रुपये
 व्यावसायिक, विक्रेते, पानटपरीवाल्यांनी घाण टाकल्यास - ५०० रुपये 
 हातगाडीचालकांचे अतिक्रमण व घाणीसाठी - ५०० रुपये
 गुटखा खाऊन थुंकणे - ५०० रुपये

Web Title: rules of solid decay are being torn daily