Leopard
sakal
शेंदुरवादा - गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा परिसरात वन्यप्राण्यांच्या वावराने ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली असून, पळा पळा… बिबट्या आला! अशी आरोळी गाव शिवारात घुमत आहे. गुरुवारी (ता.13) सकाळी शेंदुरवादा येथील शेतकरी जगदीश म्हैसमाळे व आदिल चाऊस शेतकऱ्यांच्या गोठ्यात वसारांचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आल्यानंतर हा हल्ला बिबट्याने केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण भागात भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे.