ग्रामविकास अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

औरंगाबाद - तुळजापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ लिपिक अशोक काळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत लोकरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. मृत काळे 17 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर 4 मार्चला त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांच्या खिशात दोन चिठ्या आढळल्या. त्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची नावे होती व त्यांनी मनस्ताप दिल्याचा उल्लेख होता. न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या बंधपत्रावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
Web Title: Rural Development Officer granted anticipatory bail