esakal | हिंगोली शहरात सामान खरेदीसाठी उडाली झुंबड; एक वाजता होत आहेत बाजारपेठ बंद

बोलून बातमी शोधा

बाजारपेठ
हिंगोली शहरात सामान खरेदीसाठी उडाली झुंबड; दुपारी होत आहे बाजारपेठ बंद
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. यापूर्वी किराणा, भाजीपाला विक्रीची दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळी सुरु होती. त्यात रविवारी (ता. २५) बदल करण्यात आल्याने दुपारी दिडनंतर एक मेपर्यंत कडक लाँकडाऊनचे आदेश दिल्याने दुपारी बारापर्यंत बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. एक वाजता बाजारपेठ बंद झाल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन वेळोवेळी त्यावर उपाय योजना करीत आहे. यापूर्वी ता. १४ ते एक मे या कालावधीत अत्यावश्यक सेवेत मोडणारी किराणा, भाजीपाला, दुधविक्रीची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु होती. मात्र खरेदीच्या नावाखाली बाजारात ग्राहकांची गर्दी कायम राहत होती.

हेही वाचा - केंद्र सरकार काँग्रेसशासित राज्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप होत आहे

ही गर्दी कमी करुन कोरोना साखळी तोडण्यासाठी शनिवारी (ता. २४) जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नवीन आदेश लागु केले यात सकाळी सात ते दहा यावेळी सुरु असलेली दुकाने रविवारी दुपारी दिडनंतर एक मेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने रविवारी सकाळी बाजारात किराणा, भाजीपाला व इतर आवश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

शहरात सहा ठिकाणी भाजीपाला विक्रिच्या दुकानावर ग्राहक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. तसेच किराणा दुकानावर देखील गर्दी झाली होती. दुपारी दिड वाजता दुकाने बंदचे आदेश असताना एक वाजताच किराणा, भाजीपाला, फळे विक्रीची दुकाने बंद झाल्याने बाजारात शुकशुकाट झाला होता. काही वेळाने रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे