म्हस्के, पाटील यांना कॉंग्रेसकडून नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

लातूर - अपहरण आणि खंडणी प्रकरणात नगरसेवक सचिन म्हस्के आणि पुनीत पाटील यांच्या संदर्भाने समोर येणारी माहिती अत्यंत धक्कादायक, त्रासदायक आणि तेवढीच अविश्‍वसनीय आहे. या प्रकाराचा कॉंग्रेस पक्ष निषेध करीत असून, या दोघांनाही पक्षाकडून तातडीने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी सांगितले.

लातूर शहरातील दोन क्‍लासचालकांचे अपहरण करून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांसह सात जणांवर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी नगरसेवक सचिन म्हस्के याला पोलिसांनी अटकही केली आहे; तर इतर आरोपी अद्याप फरारी आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी भाजपने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या प्रकरणाबाबत रविवारी (ता. 30) आपली भूमिका जाहीर केली.

Web Title: Sachin Mhaske and Punit Patil Notice by Congress